श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचा धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ

श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा मंदिरात श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचा धूमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ पाच वर्ष एकत्र राहण्याची उमेदवार व पॅनेल प्रमुखांनी घेतली शपथ

श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचा धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ

राजगुरूनगर : श्रीक्षेत्र निमगाव येथील खंडोबा मंदिरात सर्वपक्षीय श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि.२१) रोजी श्रीफळ फोडून करण्यात आला.खंडोबा मंदिरात उपस्थित पॅनेलचे सर्व उमेदवार व प्रचार प्रमुखांनी एकत्रितपणे देवाचा भंडारा हातात घेऊन पाच वर्ष एकत्र राहण्याची शपथ घेतली.

श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार व प्रमुखांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवाची पुजा केल्यानंतर तळी भरून देवाचा जयघोष करण्यात आला.यावेळी सर्वांनी पाच वर्ष एकत्र राहण्यासाठी हातात भंडारा घेऊन शपथ घेतली.त्यानंतर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत सभा झाली. यावेळी पॅनेलचे प्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील,तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,बाबाजी काळे,तनुजा घनवट,दूध संघांचे माजी संचालक शेखर शेटे,संजय घनवट,माजी उपसभापती चांगदेव शिवेकर,ज्योती अरगडे,दिलीप वाळके,रामहरी आवटे, शिवाजी वर्पे,अशोक खांडेभराड,काळुराम कड,कल्पना गवारी, प्रकाश वाडेकर,प्रिया पवार,रोहित डावरे पाटील,काळुराम पिंजण, सुनील देवकर,दत्तात्रय मांडेकर,दत्तात्रय टेमगिरे आदी मान्यवर व  पॅनेलचे उमेदवार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बुट्टे पाटील म्हणाले की बाजार समितीची निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र विचाराने आणि मुद्यावर जिंकणार आहे.चाकण व राजगुरूनगर बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा नाहीत.शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही.माजी आमदार स्व.नारायण पवार यांचे राजगुरूनगर बाजार समितीच्या संकुलाला लावलेले नाव देखील यांनी काढले हे असले राजकारण बरोबर नाही.श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन बुट्टे पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना अतुल देशमुख म्हणाले आमदार मोहिते यांनी विधानसभा निवडणुकीत म्हणाले की मी आता निवडणूक लक्षविणार नाही,मग ही निवडणूक कशाला लढविता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.निवडणूक लढवून शेतकऱ्यांशी खोटेपणा केला.बाजार समितीत खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखमुख यांनी बोलताना केला.

बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला हे सत्य असून झालेला भ्रष्टाचार आम्ही विरोधकांनी बाहेर काढला.त्यावेळी आमच्याबरोबर सत्ताधारी बाजार समितीतील संचालक देखील होते.त्यांनाही झालेला भ्रष्टाचार मान्य नव्हता म्हणून सत्ताधारी संचालकांमध्ये त्यावेळी फूट पडली होती. श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन बाबाजी काळे यांनी केले.

विजयसिंह शिंदे,ज्योती अरगडे,संतोष डोळस,बाबाजी काळे, शांताराम भोसले,प्रिया पवार,शेखर शेटे,पाटील गवारी यांची भाषणे झाली.प्रास्ताविक करून आभार चंदन मुऱ्हे यांनी मानले.