Chakan crime | चाकणमध्ये कोयत्याने डोके फोडले; फिर्यादीचा हात आणि बरगडीवरही वार

जिवंत सोडत नाही, मारून टाकतो!” असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न!

Chakan crime | चाकणमध्ये कोयत्याने डोके फोडले; फिर्यादीचा हात आणि बरगडीवरही वार

 

महावार्ता लाईव्ह | दक्षिण चाकण परिसरात एका व्यावसायिक व्यक्तीला डोक्यात कोयत्याने जोरदार वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. आरोपीने "मी ** आहे, तू मला ओळखले नाहीस का? तुला जिवंत सोडणार नाही" अशा धमक्या देत हल्ला केला. जमलेल्या लोकांना देखील मारण्याची धमकी देऊन आरोपीने पळ काढला. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. 

 

घटना कशी घडली?  

दि. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता आरोग्यम हॉस्पिटल जवळ (नाणेकरवाडी, केळकरनगर, ता. खेड, जि. पुणे) ही घटना घडली. 

फिर्यादी रेवण केरवा कावळे (वय ४५ वर्षे, व्यवसाय - मजुरी, राहणार - रामनगर, चिंचवड, पणे मळ गाव, बसवेश्वर गल्ली उर्फ ढोरगल्ली, लातूर) हे हायटेक इंडस्ट्री कंपनी खराबवाडी येथे कामासाठी आले होते. 

 

फिर्यादी चालत आरोग्यम हॉस्पिटल जवळ आले असताना, पाठीमागून आरोपी जनार्धन तुकाराम पांचाळ (वय ५२ वर्षे, व्यवसाय - मजुरी, राहणार - आरोग्यम हॉस्पिटल समोर, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे; मूळ राहणार - कुरुदंवाडी, ता. बसमत, जि. हिंगोली) याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने जोरात वार केला. फिर्यादी खाली बसल्यावर त्यांनी पाहिले की हल्ला करणारा इसम त्यांचा ओळखीचा आहे. आरोपीने हातात कोयता घेतल्याचे दिसले.

 

आरोपीने ओरडत म्हटले, “तू मला काय आंडू-पांड समजलास का? तू मला ओळखले नाहीस? मी *** आहे. ***सोबत वाद घालतोस का? जिवंत सोडत नाही, मारून टाकतो!” असे म्हणून त्याने पुन्हा डोक्यात कोयत्याने वार केला. फिर्यादीने बचावासाठी उजवा हात पुढे केला असता, मनगटावर मोठी जखम झाली. नंतर आरोपीने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या बरगडीच्या कोपऱ्यावरही वार केला.

 

जमलेल्या लोकांनी फिर्यादीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने “मी *** आहे, कोणी मध्ये येऊ नका, वाचवायला आलात तर तुम्हालाही मारून टाकीन!” असे म्हणून कोयता उगारून लोकांच्या दिशेने धाव घेतली. घाबरलेले लोक पळून गेले आणि आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकाने बंद केली. आरोपीने त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.


फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी जनार्धन तुकाराम पांचाळ याला तातडीने अटक केली आहे.