खेड तालुक्यात २३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता : शिंदे गटाकडे २ ग्रामपंचायत
आमदार दिलीप मोहिते पाटील यांची ताकद वाढली ;
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडशे व अपर तहसीलदार स्नेहा शिंदे यांचे अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.६) राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात शांततेत संपन्न झाली.मतमोजणीवेळी राजगुरूनगर ठाण्याचे पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण केली.निवडणूक झालेल्या १९ आणि बिनविरोध झालेल्या ६ अशा एकूण खेडच्या २५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली.तर दोन ग्रामपंचायती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्या आहेत.तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा, ठाकरे गट,शरद पवार गट,काँग्रेस यांना एकही ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविता आली नाही.
खेड तालुक्यातील एकूण २५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका लागल्या असता ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.५) मतदान झाले.त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.६) रोजी सकाळी १० वाजता क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरवात करून संपूर्ण मतमोजणी अवघ्या दोन तासात म्हणजे १२ वाजता समाप्त झाली.मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.आमदार दिलीप मोहिते यांचे गाव असलेल्या शेलपिंपळगाव ग्रामपंचायतीत त्यांची सत्ता आली. संतोषनगर ग्रामपंचायतीत भाजपाचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांचा पॅनल भुईसपाट झाला.वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीत बाजार समितीचे संचालक पप्पूदादा टोपे यांच्या पॅनलने बाजी मारली.तर माजी सभापती लक्ष्मण टोपे पॅनेलचा पराभव झाला. राजगुरूनगर सहकारी बँकेचे संचालक व विद्यमान सरपंच अरुण थिगळे यांच्या पत्नी सांडभोरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या.सुपे ग्रामपंचायतीवर दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांचे वर्चस्व कायम राहिले.शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी सभापती भगवान पोखरकर यांनी वाळद व गाडकवाडी या दोन ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी क्रीडा संकुल परिसरात गर्दी केली होती.
लोकनियुक्त सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे -
-------------------------------
सातकरस्थळ ग्रामपंचायत -
लोकनियुक्त सरपंच - ऋतिक आकाश सातकर
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - प्रमोद शंकर सुपे, निलेश सुदाम अरबूज, स्वाती अभिजीत सातकर.वॉर्ड क्र २ - मयूर विठ्ठल जगदाळे (बिनविरोध),नयना प्रवीण काळे,अमिता राजेश सातकर.वॉर्ड क्र ३ - अजय जयराम चव्हाण,जयश्री संतोष पडवळ,वर्षा किरण देवरे.
---------------------------------
सांडभोरवाडी ग्रामपंचायत -
लोकनियुक्त सरपंच - प्रतीक्षा संतोष पाचारणे सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - प्रियंका स्वप्नील ढोरे,भगवान रामदास पाचरणे,प्रियांका महेंद्र पाचरणे,वॉर्ड क्र २ - रंगनाथ भिकाजी आरुडे,ज्ञानेश्वर किसन आरुडे,कविता संतोष आरुडे.वॉर्ड क्र ३ - विठ्ठल किसन वरकड,ज्योती राहुल सांडभोर (बिनविरोध).वॉर्ड क्र ४ - बाळू सोपान सांडभोर,सीमा निलेश पठारे,कविता सचिन सांडभोर.
-------------------------------
वाळद ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - मनोहर बबन पोखरकर
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - विक्रम दादाभाऊ पोखरकर,धनिका संतोष पोखरकर,मनीषा बाळासाहेब सावंत. वॉर्ड क्र २ - शकुंतला शंकर तळपे,दिनेश बबन लांडगे.वॉर्ड क्र ३ - नितीन सदाशिव वाळुंज,मीराबाई चंद्रकांत पोखरकर.
---------------------------
कोहिनकरवाडी ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - पंढरीनाथ गणपत कोहिनकर
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - स्वप्निल दत्तात्रय कोहिनकर,मोनिका निखिल कोहिनकर,भाग्यश्री सुधीर कोहिनकर,वॉर्ड क्र २ - सोमनाथ पांडुरंग कोहिनकर,प्रियंका दत्तात्रेय मुळे.वॉर्ड क्र ३ - गणेश नंदकुमार मुळे,काजल सोमनाथ करमारे.
------------------------------
कोळीये ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - साधना दत्ता कवडे
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - संतोष ममतू कवडे तर अन्य सहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
------------------------------
निघोजे ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - सुनीता कैलास येळवंडे निवडून आले तर
अन्य तेरा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
--------------------------------
पिंपळगाव तर्फे खेड ग्रामपंचायत -
लोकनियुक्त सरपंच - शरद मल्हारी मोहिते
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - बायडाबाई नवनाथ दौंडकर,वॉर्ड क्र २ - अभिषेक उत्तम दौंडकर, बाळकृष्ण हनुमंत दौंडकर,वॉर्ड क्र ३ - सुधीर संतोष गायकवाड,वॉर्ड क्र ४ -विशाल पांडुरंग पोतले,प्रिया नितीन मोहिते,वॉर्ड क्र ५- गणेश शिवाजी मोहिते, आरती संदीप पोतले,नीलम राहुल पोतले तसेच
अन्य चार जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
--------------------------------
डेहणे ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - मीना एकनाथ लांघी
सदस्यपदी वॉर्ड क्र ३ मधून शंकर हरिश्चंद्र कोरडे विजयी झाले.तर
अन्य सहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
------------------------
मोरोशी ग्रामपंचायत -
लोकनियुक्त सरपंच - युवराज रघुनाथ सोरकडे
अन्य सात जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
----------------------------
भोमाळे ग्रामपंचायत -
लोकनियुक्त सरपंच - प्रियंका अरुण आढारी
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - सुधीर मधुकर भोमाळे,वॉर्ड क्र ३ - गणेश सुरेश जफरे,अनिता जयराम सावंत
अन्य चार जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
----------------------------
वरुडे ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - सुनीता संभाजी पडवळ
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - निशा तुकाराम तांबे,वॉर्ड क्र ३ - अनुजा निलेश तांबे,चेत्राली सतीश तांबे तर
अन्य सहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
---------------------------
देशमुखवाडी ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - दत्तात्रय अनिल देशमुख सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - बापू धर्मा देशमुख,अक्षरा नंदू देशमुख,राणी प्रकाश देशमुख.वॉर्ड क्र २ - रवींद्र भरत देशमुख, सुंदर शंकर भोईर.वॉर्ड क्र ३ - विकास सुरेश भेगडे,सविता माणिक देशमुख.
------------------------------
सुपे ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - सुमित्रा सचिन चांभारे
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - अरुण महादू पिसाळ,सविता संजय खेडेकर, नंदा संभाजी पिसाळ.वॉर्ड क्र २ - कांता नामदेव बुढे, संजय सिताराम डांगले.वॉर्ड क्र ३ - दिनेश नफाजी बुढे, नकुशा सुरेश घुले.
----------------------------------
एकलहरे ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - मिरा राणू आंबेकर
अन्य सात जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
----------------------------
गोरेगांव ग्रामपंचायत
लोकनियुक्त सरपंच - आरती विलास भागीत
सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार वॉर्ड क्र १ - विठ्ठल कृष्णा गवारी, वंदना धोंडू लाडके,वॉर्ड क्र २ - प्रकाश भिमाजी गवारी, स्वाती गणेश गवारी.वॉर्ड क्र ३ - अंकुश गोपाळा गवारी, सुनंदा दत्तात्रय तळपे, मंदा नारायण गवारी.
------------------------------
धुवोली ग्रामपंचायत
वॉर्ड क्र - १ मधून पवन रामदास थोरात विजयी झाले. तर
सरपंचासह अन्य सहा जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत.
---------------------------
आडगाव ग्रामपंचायत -
वॉर्ड क्र -३ मधून - सुनील तुकाराम गावडे, फुलाबाई दशरथ साबळे विजयी झाले.तर लोकनियुक्त सरपंचासह अन्य पाच जागा यापूर्वी बिनविरोध झाले आहेत.
----------------------------------------
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून आपण गावागावात केलेल्या विकासाला नागरिकांनी साथ दिली.त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला घवघवीत यशमिळाले आहे. भविष्यात आपण विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
दिलीप मोहिते - आमदार खेड तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस
---------------------------------
