Omsai Mandal Navratri Festival | ओम साई मंडळाचे कार्य समाजाला दिशादर्शक व कौतुकास्पद : मा.आ.दिलीप मोहिते पाटील

खेळ पैठणीचा, रासदांडिया, आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न!

Omsai Mandal Navratri Festival | ओम साई मंडळाचे कार्य समाजाला दिशादर्शक व  कौतुकास्पद : मा.आ.दिलीप मोहिते पाटील

 

महावार्ता लाईव्ह | ओमसाई मंडळाकडून नवरात्र महोत्सवात दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबविले जातात. महिलांसाठी कार्यक्रम आणि लहान बालकांसह युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम असतात. ओमसाई मंडळाचे कार्य समाजाला दिशादर्शक ठरावे असे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन खेड तालुक्याचे माजी आमदार व पीडिसीसी बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांनी केले. राजगुरूनगर-राक्षेवाडी येथील ओमसाई मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवात हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी ओमसाई मंडळाचे अध्यक्ष व राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगरसेवक दिनेश सांडभोर पाटील, नगरसेविका स्नेहल राक्षे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना सातपुते, सिद्धेश्वर सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल सांडभोर, राक्षेवाडीचे माजी उपसरपंच मचिंद्र राक्षे, नामदेव चव्हाण, राष्ट्रवादीच्या माजी महिला अध्यक्षा साळुबाई मांजरे, उद्योजक किरण वाळुंज, निवेदक सुदाम कराळे, कैलास दुधाळे, देशमुख, वैभव सांडभोर, राजेंद्र मुळे, बाळा होले, हभप भीमाशंकर राक्षे, हभप रामचंद्र राक्षे, अनिकेत बोऱ्हाडे, अशोक वाळुंज आदी मान्यवरांसह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

मंडळाने ३१ वर्षाच्या कालखंडात नवरात्र महोत्सवात देवीच्या भक्तीचा जागर करताना समाजहित जोपासणारे अनेक धार्मिक व सामाजिक दिशादर्शी उपक्रम राबविले आहेत. समाजाला प्रबोधन ठरावे असे उपक्रम होतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात मानाची पैठणी, रासदांडिया, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रम, होम मिनिस्टर यासह महिलांसाठी कार्यक्रम आणि लहान बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम असतात.

 

 

 

ओमसाई मंडळाचे नाव राजगुरूनगर-राक्षेवाडी आणि पंचक्रोशीत नावाजलेले आहे. नवरात्र महोत्सवात मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाला समाजातील सर्व स्थरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो. गणेशोत्सवासह नवरात्र महोत्सव हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम मंडळ आयोजित करीत असून मंडळाचे कार्यकर्ते यांचे मोलाचे योगदान राहिल्याने सर्व कार्यक्रम यशस्वी होतात, असे दिलीप मोहिते पाटलांनी मंडळाचा गौरव करताना सांगितले.

 

यावर्षीच्या नवरात्र महोत्सवाला आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, बाजार समितीचे सभापती अशोकदादा राक्षे, युवानेते संतोष राक्षे यासह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित दाखविली.

 

नवरात्र महोत्सवात पहिल्या दिवशी देवीचा आगमन सोहळा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा, दंगलकार नितीन चंदनशिवे व्याख्यान, रासदांडिया, मेहंदी आणि रांगोळी स्पर्धा, महाआरोग्य शिबीरात रक्तदान व आरोग्य तपासणी, विविध गुणदर्शन व फणी गेम्स मुलांसाठी व महिलासाठी, घंटागाडी कर्मचारी सन्मान व गरजू महिलांना मोफत साडी वाटप अशा भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्र महोत्सव संपन्न झाला.

 

 

कोजागिरी पौर्णिमा दिनी नवरात्र महोत्सव कार्यक्रमात बक्षीसपात्र ठरलेल्या विजेत्यांना बक्षीस प्रदान करून कार्यक्रम संपन्न झाला. ओमसाई मंडळाचे सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक दिनेश सांडभोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले. नवरात्र महोत्सवात दरदिवशी न चुकता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची भूमिका मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते माणिक होरे यांनी निभावली.

 

ओम साई मंडळ दरवर्षी नवरात्र महोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच बालक, युवक व तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपक्रम आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी नवरात्र महोत्सवात नवनवीन उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न मंडळ करीत आहे. - दिनेश सांडभोर पाटील - अध्यक्ष ओमसाई मंडळ व बिनविरोध नगरसेवक, राजगुरूनगर नगरपरिषद