खेड तालुक्यात प्रजासत्ताक दिन साजरा
राजगुरूनगर : भारत देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,माध्यमिक विद्यालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,तलाठी कार्यालय,एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्या आदी ठिकाणी ध्वजारोहण मान्यवरांचे हस्ते होऊन प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे अनेक विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
एमआयडीसी क्षेत्रातील सावरदरी ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच भरत तरस यांचे हस्ते झाले.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण उद्योजक सोमनाथ तरस यांचे हस्ते झाल्यानंतर शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.वासुली ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजस्तंभाचे श्रीफळ फोडून पूजन उपसरपंच दीपक लिंभोरे यांनी केल्यानंतर ध्वजारोहण सरपंच कोमल साईनाथ पाचपुते यांचे हस्ते झाले.प्राथमिक शाळेत मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वराळे ग्रामपंचायत कार्यालय,प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र यांचे ध्वजारोहण सरपंच पूजा बुट्टे पाटील यांचे हस्ते झाले.त्यानंतर प्राथमिक शाळेत मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.लर्निंग ट्री इंग्लिश शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष व जिपचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांचे हस्ते झाले.यावेळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. भांबोली ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच शितल पिंजन यांचे झाले.प्राथमिक शाळेत ध्वजारोहण उपसरपंच अक्षदा राऊत यांचे हस्ते झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बिरदवडी ग्रामपंचायत,प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण सरपंच दत्तात्रय गोतारने यांचे हस्ते झाले.त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.आंबेठाण ग्रामपंचायत कार्यालय,प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांचे हस्ते झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संतोषनगर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच आरुणा शरद कड पाटील यांचे हस्ते झाले.यावेळी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
