शिवे येथे सरपंच संवाद सभा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती युवा सरपंच अक्षय शिवेकर यांच्याकडून देण्यात आली.
योजनांचे मंजुरीपत्रक वाटप करताना मान्यवर
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील मोठी असलेली शिवे वाकी तर्फे वाडा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच संवाद सभा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मंजुरी दिली गेली असल्याची माहिती युवा सरपंच अक्षय चांगदेव शिवेकर यांनी दिली.

यामध्ये कातकरी बांधवाना वीजमीटर वाटप करण्यात आले, विधवा व निराधार महिलांना ५००० रू अनुदान, मुलींना शैक्षणिक कामी ५००० रु, पीठगिरणी, शिलाई मशिन वाटप, दिव्यांगाना धनादेश वाटप, घरकुल मंजुरी पत्रक, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ३२ नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेऊन उखाणे व पारंपरिक गाणी- गौळणी म्हणून कार्यक्रमात रंगत आणली.

खेड पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेव शिवेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर भामाई सक्षमीकरणाच्या प्रमुख संयोजिका सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून महिलांना मार्गदर्शन केलं. पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके यांनी सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच अक्षय शिवेकर यांनी ग्रामस्थांना सर्व योजनाची माहिती देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी उपसरपंच कविता शिवेकर, चेअरमन शिवाजी शिवेकर, व्हा. चेअरमन रमेश सोनवणे, माजी चेअरमन नामदेव शिवेकर, ग्रामपंचायत सदस्या, ललिता गडदे, दीपाली कोळेकर, माजी सरपंच आशाबाई साकोरे, सोसायटी संचालक किसन गडदे, शोभा शिवेकर, जिजाभाऊ शिवेकर, काळूराम पं. शिवेकर, यशवंत शिवेकर, स्वप्निल सातपुते, जयराम खेंगले, संतोष धोंडिबा शिवेकर, पोपट साळुंके, मनोहर शिवेकर, गबाजी शिवेकर, सुनीता शिवेकर, काळूराम गडदे, नवनाथ गडदे, दशरथ शिवेकर, अतुल कुंभार, सुभाष शेळके, भगवान शिवेकर, तात्याभाऊ शिवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश शिवेकर, आदित्य गायकवाड, निखिल शिवेकर, तसेच ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या मनीषा शिवेकर व मयूर मोरे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य आनंद साकोरे यांनी मानले.
