Khed | राजगुरुनगर येथे पुस्तकमैत्री बुकगॅलरीचा प्रथम वर्धापन दिन संपन्न
" प्रतिपश्चंद्र " आणि " केदारनाथ " या कादंबरीचे लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांची प्रमुख उपस्थिती

राजगुरुनगर : वाचनाशिवाय लेखन शक्य नाही.वाचन लेखकाला लिहिण्यासाठी समृद्ध करते. स्वतः लेखक होण्यापूर्वी अनेक प्रकारच्या पुस्तकांची वाचणे केली आहेत.अजूनही सातत्याने वाचन करतो. पुस्तकांसोबत माणसांनी सुद्धा वाचायला शिकले पाहिजे. मी पेशाने डॉक्टर असूनही माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट माझ्यासाठी एक पुस्तक असतो असे प्रतिपादन लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी केले.
राजगुरूनगर (ता.खेड) पुस्तकमैत्री बुकगॅलरीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त " लेखक आपल्या भेटीला " या उपक्रमांतर्गत " प्रतिपश्चंद्र " आणि " केदारनाथ " या कादंबरीचे लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम वर्धापनदिन संपन्न झाला.
यावेळी प्रतिपश्चंद्र आणि केदारनाथ या दोन्ही कादंबऱ्यांच्या निर्मितीचा प्रवास सांगण्यात आला. डॉ. कोयाडे यांच्या विनोदी आणि ललित्यपूर्ण शैलीतील वक्तव्याने दिड तासांचा हा कालावधी उपस्थित वाचकवर्गास मंत्रमुग्ध करून टाकणारा होता. या कार्यक्रमाचे आयोजन पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारी यांनी केले होते.ॲड.शुभम घाडगे यांनी उपस्थित वक्त्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप होले, डॉ. प्रमिला बांबळे,डॉ. वंदना शेवाळे, रजत जांभळे, ॲड.साधना बाजारे,डॉ. नीलम गायकवाड, सौ. मनीषा पवळे,डॉ. कुंतल जाधव,मीनाक्षी पाटोळे, ॲड.अक्षय पाटोळे, प्रा.वैभव ऐदाळे, चेतना कड, अंजली मोरडिव, मनोहर मोहरे, कल्पना जाधव, उषा लोहकरे, सुवर्णा विरणक, शामल सोनवणे, पायल चौधरी, ॲड.दिपाली वाळुंज, पुनम इंगळे, संगीता लोहकरे, रामेश्वरी कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. शितल खिसमतराव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.