भांबोलीच्या एपीएम कंपनीकडून शेलू येथील आदिवशींना अत्यावश्यक किराणा किटचे वाटप : संतोष पडवळ
राजगुरूनगर: प्रतिनिधी
शेलू (ता.खेड) येथील ठाकरवाडीतील आदिवासी १०० लोकांना जीवनावश्यक किटचे वाटप एपीएम टर्मिनल कंपनीने केले.अत्यावश्यक किराणा किट मिळाल्याने आदिवासी लोकांनी आनंद व्यक्त केला.
भांबोली (ता.खेड) हद्दीत एपीएम टर्मिनल कंपनी असून या कंपनीने कोरोनाच्या काळात शेलू गावच्या ठाकर अधिवाशी समाजासाठी चारवेळा जीवनावश्यक किराणा किट वाटप केले.वाटप प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक अमितेश श्रीवास्तव,बापूसाहेब कदम,रुद्रा सोमया,गावचे सरपंच अक्षय पडवळ,उपसरपंच संपत पडवळ,ग्रामपंचायत सदस्य अक्षय गाडे, संतोष पडवळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाचे काळात आदिवासी ठाकर लोकांना हाताला कामधंदा नव्हता त्यामुळे खाण्याची उपासमार होती. त्यावेळी एपीएम कंपनीने येथील आदिवासी लोकांना किराणा किट आमच्या विनंतीनुसार वाटप करून मदतीचा हात दिला.कंपनीने चारवेळा किराणा साहित्य वाटप केल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पडवळ यांनी सांगितले.
