माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांना ६ वेळा विधानसभेचे तिकीट मिळाले होते. चार वेळा त्यांनी निवडणुक जिंकली होती.

माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे आल्पशा आजाराने रविवारी चाकण येथील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्यात एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांना ६ वेळा विधानसभेचे तिकीट मिळाले होते. चार वेळा त्यांनी निवडणुक जिंकली होती. त्यांनी १९८५ ते २००९ या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून जुन्नरची सेवा करत तालुक्याचा विकास केला.अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होत.

बेनके यांचा अंत्यविधी सोमवारी दुपारी ४ वाजता त्यांच्या गावी हिवरे बुद्रुक ( ता. जुन्नर ) या ठिकाणी होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार यांनी दिली आहे. त्यापूर्वी सोमवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत नारायणगाव येथील  निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.