शिवे आणि करंजविहिरे गावांना जल जीवन मिशन मधून पाणीपुरवठा योजना मंजूर : गटनेते शरद बुट्टे पाटील यांची माहिती

शिवे आणि करंजविहिरे गावांना जल जीवन मिशन मधून पाणीपुरवठा योजना मंजूर : गटनेते शरद बुट्टे पाटील यांची माहिती

चाकण : प्रतिनिधी 
खेड तालुक्याच्या पिंपरी–पाईट जिल्हा परीषद गटातील शिवे आणि करंजविहिरे (थोपटवाडी) या दोन गावांसाठी  पाणीपुरवठा योजनांना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुरी मिळाली असून शिवे योजनेला १ कोटी ३२ लाख तर करंजविहिरे योजनेला ७४ लाख ९२ हजार निधीची तरतूद करण्यात आल्याने दोन्ही योजना मिळून २ कोटी ६ लाख ९२ हजार रुपये  निधीची तरदूत केल्याची माहिती या गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी वराळे येथे दिली.
       शिवे व करंजविहिरे (थोपटवाडी) या गावांना पाणी पुरवठा योजना २५ मे २०२१ रोजी मंजूर झालेल्या होत्या. परंतु नंतरच्या काळामध्ये राज्य शासनाकडून दरसूचित बदल झाल्यामुळे वाढलेल्या दराने सदर योजनांची अंदाजपत्रके तयार करून पुन्हा प्रशासकीय मान्यता देण्यात आली.आता लवकरच पुढच्या टप्प्यात तातडीने या दोन्ही कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.वाढलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने या गावांना पाणी योजनेची गरज होती.नागरिकांची गरज ओळखून आपण दोन्ही गावच्या योजना तातडीने आणि सततचा पाठपुरावा केल्याने योजना मंजूर केल्या.२०२१ वर्षाच्या अखेरीस या योजनांची कामे सुरू करून ती पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------
शिवे योजनेची वैशिष्ट्ये
दरडोई खर्च ३२५१ रूपये
विहीर खोदाई व बांधकाम
मोटार घर व पंप संच (१२.५ एच.पी.)
वितरण लाईन विविध व्यासाचे
मुख्य दाबनलिका ४ इंची लाईन
उंचावरील पाणी साठवण टाकी १.१६ लाख लीटर.
------------------------------------------------------------------------------
करंजविहिरे (थोपटवाडी) योजनेची वैशिष्ट्ये
दरडोई खर्च ४५९५ रूपये
विहीरीमध्ये सुधारणा करणे 
मोटार घर व पंप संच (७.५ एच.पी.)
वितरण लाईन विविध व्यासाची
मुख्य दाबनलिका ३ इंची लाईन
उंचावरील २ साठवण टाकी प्रत्येकी २५ हजार लिटर.
------------------------------------------------------------------------------