संतोषनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रशांत कड यांची बिनविरोध निवड
सरपंचपदाचा पदभार शरद सुदामराव कड पाटील यांनी स्वीकारला.

चाकण : खेड तालुक्यातील महत्वाच्या संतोषनगर ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार शरद सुदामराव कड पाटील यांनी स्वीकारला.त्यानंतर सरपंच कड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत प्रशांत शांताराम कड पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
संतोषनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकित शरद कड पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणून जनतेतून निवड झाली होती.त्यानंतर शुक्रवार (दि.२४) रोजी उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच शरद कड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली.निवडणूक निरीक्षक म्हणून प्रशांत साबळे व ग्रामसेविका संजीवनी बागडे यांनी काम पाहिले.उपसरपंच पदासाठी प्रशांत कड यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा सरपंच कड यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात केली.निवडीनंतर सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रसंगी सभागृहात ग्रामपंचायत सदस्य तुषार कड,सुरेश देवकर,सचिन कड,पदमा कड,सुवर्णा कड,अँड हर्षदा कड,कविता कड,भारती ढगे तसेच माजी सरपंच अविनाश मलघे, अरुणा कड,राहुल कड,शिवाजी कड,माणिक कड,चंद्रकांत कड,दत्तात्रय कड,बबनराव कड,रुपेश कड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.उपसरपंचपदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी चाकण पोलिसांचा बंदोबस्त होता.
गावातील आवश्यक विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन गावचा विकास साधला जाईल.असे नवनिर्वाचित सरपंच शरद कड व उपसरपंच प्रशांत कड यांनी निवडी प्रसंगी सांगितले.