शिवे येथे डिजिटल सातबाराचे वितरण.

शिवे येथे डिजिटल सातबाराचे वितरण.

राजगुरूनगर:प्रतिनिधी

          राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे मोफत डिजिटल सातबारा योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप शिवे येथे पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांचे हस्ते झाले.

             यावेळी कृषी मंडल अधिकारी घनश्याम अभंग, सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर,तलाठी समीर शालीग्राम, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके,तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम शिवेकर, ग्रा.पं. सदस्य अक्षय शिवेकर, आनंद साकोरे, चेअरमन नामदेव शिवेकर,तुकाराम शिवेकर,शिवाजी शिवेकर,बबन सातपुते,दत्ताराम सातपुते,कैलास शिवेकर, कोतवाल दीपाली गिधे,काळूराम साळुंके,शंकर सातपुते, पोपट सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.
      शेतकऱ्यांनी आपला सातबारा तपासून घ्यावा, सातबारा मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्यात,वेळोवेळी फेरफार तपासावेत,निराधार योजनेची प्रकरणे करावीत तसेच इ पीक पाहणी करावी असे आवाहन शेतकऱ्यांना उपसभापती चांगदेव शिवेंकर यांनी केले.
          मंडल कृषी अधिकारी घनश्याम अभंग यांनी शासनाचे शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती दिली, तलाठी समीर शालिग्राम यांनी देखील महसूल स्तरावरील रेशनिंग कार्ड,निराधार योजना,फेरफार, इ पीक पाहणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके यांनी केले,आभार सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर यांनी मानले.