Khed | शिवे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आनंदा साकोरे यांची बिनविरोध निवड

मागील पंचवार्षिक मध्ये उपसरपंच आनंदा साकोरे यांच्या मातोश्री आशाबाई साकोरे यांनी शिवे ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते.

Khed | शिवे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आनंदा साकोरे यांची बिनविरोध निवड

 

राजगुरूनगर | खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील मध्यवर्ती असलेल्या शिवे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आनंदा रामदास साकोरे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

 

 

 

मावळत्या उपसरपंच कविता संतोष शिवेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आनंद साकोरे यांची निवड करण्यात आली. शिवे ग्रामपंचायत सभागृहात सरपंच अक्षय शिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली,प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक उल्हास कोरडे यांनी पाहिले.

 

 

निवडीनंतर ग्रामस्थांनी साकोरे यांचा सन्मान केला यावेळी पंचायत समिती मा.सभापती चांगदेव शिवेकर, उपसरपंच कविता शिवेकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, माजी उपसरपंच निर्मला कोळेकर, चेअरमन संपत शिवेकर, विश्वास शिवेकर, नामदेव शिवेकर, दत्तात्रय शिवेकर, मारुती कोळेकर, विश्वनाथ शिवेकर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके, तुकाराम शिवेकर, सुभाष शेळके, माजी सरपंच आशाबाई साकोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहे.

गावच्या विकास कार्यासाठी काम करणार असल्याचे यावेळी उपसरपंच आनंद साकोरे यांनी सांगितले.