Rajgurungar | पतीने केला पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून
राजगुरुनगर जवळच्या पडाळवाडी येथील घटना |
राजगुरूनगर : कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीस माहेरवरून पैसे आणण्याचा तगादा लावणाऱ्या पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी खेड पोलिसांनी पतीस अटक केली असून ही घटना राजगुरुनगर जवळच्या पडाळवाडी येथे घडली आहे.
आदिनाथ सुखदेव कुटे (वय - ४० रा.सध्या रा.पडाळवाडी, थिगळस्थळ राजगुरुनगर मुळ रा.निर्मलनगर जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.यामध्ये सीमा आदिनाथ कुटे( वय - ३५) खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आदिनाथ याने काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी पत्नी सीमाला माहेर वरून पैसे आणण्याचा तगादा लावत असे.परंतु सीमा यांची माहेरची परिस्थिती गरीब असल्याने पैसे आणले नाही.तसेच आदिनाथ दारू पिऊन पत्नी सीमाला मानसिक,शररिक छळ व शिवीगाळ करून वारंवार त्रास देत होता.माहेरहून पैसे न आणल्याच्या कारणाने याचा मनात राग धरून आदिनाथ याने राहत्या घरात सीमा हीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याची घटना घडली.
पोलिसांनी आरोपी आदिनाथ याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली.याप्रकरणी पुढील तापस सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव करीत आहेत.
