Khed | संकल्प युवा प्रतिष्ठाणकडून धामणे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

Khed | संकल्प युवा प्रतिष्ठाणकडून धामणे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप

राजगुरूनगर : धामणे (ता.खेड) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संकल्प युवा प्रतिष्ठाण खारदांडा (मुंबई) यांच्याकडून मोफत छत्री वाटप करण्यात आले. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माणिक भवार यांच्या संकल्पणेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत येताना पावसापासून संरक्षण मिळावे या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

 

याप्रसंगी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माणिक भवार,  वहागावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सोनल नवले,वहागाव शाखा अध्यक्ष सुनिल नवले, कैलास नवले, धिरज सिकदर, विशाल जाधव, सूरज शेळके, राहुल नवले, बाबाजी सातपुते आदि मान्यवर व ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

 

प्रतिष्ठाणने मागील वर्षी धामणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार दप्तर वाटप केले होते. गरजू शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षांपासून प्रतिष्ठाण राबवत आले आहे. संकल्प प्रतिष्ठाणच्या उपक्रमांचे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे आणि खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी कौतुक केले.

 

कार्यक्रमाचे संयोजन गोरख नवले, अमर केदारी, मंगल निमसे या शिक्षकांनी यशस्वीपणे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले. सूत्रसंचालन गोरख नवले यांनी केले तर अमर केदारी यांनी आभार मानले.