Khed | राक्षेवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन
राजगुरुनगर | राक्षेवाडी (ता.खेड) येथील विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापने निमित्त अखंड हरीनाम सप्ताह ११ ते १८ मार्च दरम्यान आयोजित केला असून सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांची किर्तने होणार आहेत.
येथील सप्ताहाचे यंदाचे २९ वे वर्ष आहे.सप्ताहत दररोज पहाटे काकडा आरती,सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी नेमाचे भजन,सायंकाळी हरिपाठ,त्यानंतर महाप्रसाद,रात्री किर्तनसेवा झाल्यानंतर हरी जागर असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.सप्ताहात पहिल्या दिवशी गुरुवार (दि.११) हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर),दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि.१२) हभप भरत महाराज थोरात (वडगाव पाटोळे),तिसऱ्या दिवशी शनिवार (दि.१३) हभप सागर महाराज शिर्के,चौथ्या दिवशी रविवार (दि.१४) हभप दर्शन महाराज कबाडी, पाचव्या दिवशी सोमवार (दि.१५) हभप किशोर महाराज बांगर,सहाव्या दिवशी मंगळवार (दि.१६) हभप ज्ञानेश महाराज फलके,सातव्या दिवशी बुधवार (दि.१७) रामनवमी निमित्त सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान हभप अशोक महाराज हकाळे यांचे किर्तनसेवा होईल.
सायंकाळी ५ वाजता दिंडी ग्रामप्रदक्षणा होणार असून ६ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता व दीपोत्सव कार्यक्रम होईल.त्यानंतर रात्री हभप पोपट महाराज राक्षे यांची किर्तनसेवा होईल.शेवटच्या दिवशी गुरुवार (दि.१८) काल्याचे किर्तन हभप अशोक महाराज जाधव यांचे असून त्यांच्या कीर्तनाने सप्ताहाचा शेवट आहे.
आयोजित सप्ताह कार्यक्रमात परिसरातील भाविकभक्तांसह गावच्या नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन हनुमान प्रासादिक भजनी मंडळ व समस्त राक्षेवाडी ग्रामस्थांनी केले.
