Khed | आळंदीत भर रस्त्यात पोलिसाला लाथा - बुक्क्यांनी मारहाण
गाडीवर पावती टाकल्याचा राग मनात धरून तरुणाने वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण
Crime Aalndi police station
आळंदी | गाडीवर पावती टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणाने वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३) सकाळी आळंदीतील मरकळ चौक येथे घडली.
विजय नामदेव जरे (वय ३३, रा. गोपाळपुरा, चाकण चौक आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक अंकुश कान्छु वाडेकर (वय ५४) यांनी शुक्रवारी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडेकर हे मरकळ चौक, आळंदी या ठिकाणी वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी आरोपी जरे याने फिर्यादी वाडेकर यांनी यापूर्वी त्याच्या गाडीवर पावती टाकल्याचा राग मनामध्ये धरुन, तुला माहित नाही का मी स्थानिक आहे. गाडीवर तू पावती का करतो तुला इथे राहायचे नाही का, अशी धमकी दिली.
