विकास प्रक्रियेने गाव पुढे नेण्यासाठी शेलू गावाला निधी कमी पडू देणार नाही : शरद बुट्टे पाटील
शेलूत ९१ लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे हस्ते संपन्न
Bjp pune presidet Sharad buttepatil | sarpanch Akshay padwal
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शेलू गावात ९१ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे हस्ते संपन्न झाल्याची माहिती गावचे सरपंच अक्षय पडवळ व उपसरपंच अक्षय गाडे यांनी दिली.
जिल्हा नियोजन जनविकास सुविधा २०२३ - २४ अंतर्गत शेलू गावासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या प्रयत्नाने जवळपास ९२ लक्ष रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झाला.याकामांचे उदघाटन व भूमिपूजन बुट्टे पाटील यांचे हस्ते संपन्न झाला.शेलू स्मशानभूमी सुधारणा व शेलू लिंबफाटा रस्ता करणे, करंडेवस्ती, ठोंबरेवस्ती, गणेश पडवळवस्ती, घावटेवस्ती, कारलेवस्ती, शेलू ठाकरवाडी, शेलू भीमनगर,पडवळवस्ती या ठिकाणी रस्ता करणे या कामांना निधी मंत्री पाटील व जिल्हाध्यक्ष बुट्टे पाटील यांनी मंजूर केला.
शरद बुट्टे पाटील यांचेहस्ते विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन प्रसंगी सरपंच अक्षय पडवळ, उपसरपंच अक्षय गाडे, ग्रामपंचायत सदस्य कोमल पडवळ,रुपाली कचाटे, प्राजक्ता बधाले, अर्चना चोरघे, रुपाली पडवळ,सुरज सांडभोर, मंजुळा गावडे, ग्रामपंचायत अधिकारी तानाजी पाटील व भाजपचे पदाधिकारी संजय रौधळ, सुनिल देवकर ,रोहित डावरे, संदीप पडवळ कैलास पडवळ,महेश पडवळ, पोपट पडदुणे, तुकाराम कड सुनिल पडवळ, गणपत ठोंबरे, विनायक ठोंबरे, विजय ठोंबरे, नारायण गाडे, शिवाजी पडवळ, भानुदास पडवळ, योगेश पडवळ, बाळासाहेब ठोंबरे माऊली पडवळ आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी बुट्टे पाटील यांचा सत्कार केला.गावासह वाड्यावस्त्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही व गाव विकासाने पुढे नेणार असे आश्वासन ग्रामस्थांना बुट्टे पाटील यांनी बोलताना दिले.यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.सर्वांचे स्वागत सरपंच अक्षय पडवळ व आभार उपसरपंच अक्षय गाडे यांनी मानले.
