राक्षेवाडीतील आदर्श माता ताराबाई राक्षे यांचे निधन ; माजी उपसभापती अशोकदादा राक्षे यांना मातृशोक
मनमिळावू व शांत स्वभावाच्या ताराबाई ताई राक्षे यांचे निधन, राक्षे परिवारावर शोककळा
महावार्ता लाईव्ह | राक्षेवाडी (ता.खेड) येथील आदर्श माता ताराबाई बबनराव राक्षे वय ८४ यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी (दि.१) मे रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले, पुतणे, सुना, नातू, भाचे, नातसून,असा मोठा परिवार आहे. राक्षे परिवारातील सदस्य त्यांना ताई या नावाने हाक मारायचे. त्या अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती,विद्यमान संचालक व राक्षेवाडी गावचे माजी सरपंच अशोकदादा राक्षे यासह राक्षेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव राक्षे, ज्ञानेश्वर राक्षे व गुलाबराव राक्षे यांच्या त्या मातोश्री होत. तसेच राजगुरुनगर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड.अनिल राक्षे, राक्षेवाडी गावचे पोलीस पाटील पप्पूकाका राक्षे, कोंडीभाऊ राक्षे, गोपाळा राक्षे हे त्यांचे पुतणे होत.
त्यांच्यावर राजगुरुनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करते समय अनेक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक किरणदादा आहेर, राहुल तांबे, अरुण थिगळे, जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट, पंचायत समितीचे सदस्य दिलीप दुबे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, नगरसेवक दिनेश सांडभोर पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, उद्योजक माऊलीशेठ करंडे, शिवसेनेचे नेते संजय घनवट, माजी सरपंच विजय थिगळे यासह अनेक गावचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
