"बाप" या विषयावर खुले कवी संमेलन वडगांव पाटोळे येथे संपन्न
राजगुरूनगर : प्रतिनिधी
वडगाव पाटोळे (ता.खेड) येथील निसर्गाचे सानिध्यातील ढुम्या डोंगराचे पायथ्याशी असलेल्या चिक्कूच्या घनदाट बागेमध्ये सुवर्णकार समाजाचा स्नेहमेळावा आणि बाप या विषयावर खुले कवी संमेलन पार पडले.पुणे जिल्ह्यातील ३५ कवींनी आपल्या कविता संमेलनात सादर केल्या.
राजगुरूनगर येथील सुवर्णकार समाज मेळाव्याच्या निमित्ताने कै.कांताराव वडगावकर स्मृती प्रित्यर्थ वडगाव पाटोळे गावाच्या शिवारातील चिक्कूच्या बागेत बाप विषयावर खुले कवी संमेलन राजगुरूनगर सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी काशीनाथ फाकटकर यांचे अध्यक्षतेखाली कवी समेलन संपन्न झाले.यावेळी नाशिक त्रिंबकेश्वर धर्मशाळेचे अध्यक्ष सुर्यकांत बेल्हेकर,कवी व इंजिनिअर शिवाजी चाळक,प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे, म.सा.प.राजगुरूनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे,मधूकर गिलबिले,डी.के.वडगावकर,बाळकृष्ण बेल्हेकर,सोमनाथ घोडेकर,सुर्यकांत कडूसकर,ढुम्या ग्रुपचे सदस्यासह जिल्ह्यातील मान्यवर कवी उपस्थित होते.
बाप विषयावर हनुमंत चांदगुडे, शिवाजी चाळक, बाळासाहेब वाडेकर,मनोहर मोहरे,डॉ.हनुमंत भवारी, साहेबराव पवळे,प्रा.सुभाष साळुंखे,सुदाम भोगाडे,अर्चना पोखरकर,सुवर्णा वाघमारे,सरिता पोटवडे,महेंद्र गाडे, बाबासाहेब गायकवाड,आत्माराम हारे,चंद्रकांत जोगदंड, सीताराम नरके,बाबाजी शिंदे,प्रल्हाद शिंदे या कवींनी कविता सादर केल्या.कवी बाबाजी शिंदे यांनी बायको विषयी गजल सादर केली.मराठीतील गजल हभप सुदाम भोगाडे तर आई विषयी हृदयस्पर्शी कविता साहेबराव पवळे यांनी सादर केली.बालदिनानिमित्त यावेळी लहान मुलांसाठी स्पर्धा होऊन बक्षीस वितरण झाले.
बोलताना चाळक म्हणाले,सोन्यालाही अग्नी परीक्षा द्यावी लागते,त्याचे दुःख सोन्याला नसते.परंतु गुंज गुंज सोन्यासाठी तुकडे करताना सोन्याला दुःख होते.
सूत्रसंचालन कवी संतोष गाढवे यांनी केले.आभार काशीनाथ फाकटकर यांनी केले.
--------------------------------------------------------------------------
