आधारकार्ड आणा अन् एका तासात गॅस कनेक्शन; राजगुरूनगरमध्ये ‘नव्या’ सिलिंडरची सुविधा

एचपी कंपनीकडून १० किलोच्या नव्या सिलिंडरची सुविधा; आनंद गॅस एजन्सीकडे ग्राहकांची गर्दी

आधारकार्ड आणा अन् एका तासात गॅस कनेक्शन; राजगुरूनगरमध्ये ‘नव्या’ सिलिंडरची सुविधा

 

महावार्ता लाईव्ह | हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने १० किलो वजनाचा नव्या गॅस सिलेंडर लॉंच केला आहे. राजगुरूनगर येथील आनंद गॅस एजन्सीमध्ये हा नवीन गॅस सिलेंडर उपलब्ध असून अवघ्या एका तासात गॅस सिलेंडर मिळत आहे. हा गॅस घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

 

१४ किलो वजनाचा गॅस सिलेंडर मिळण्यासाठी ग्राहकांना २५ दिवसानंतर बुकिंग करून मिळत आहे.नव्या गॅस सिलेंडर फक्त आधारकार्ड घेऊन आलेल्या भारतातील व्यक्तीला फक्त १ तासात गॅस कनेक्शन मिळत आहे. गॅस सिलेंडर संपल्यानंतर देखील काही सेकंदात बुकिंग होताच होम डिलिव्हरी १ तासात मिळत आहे. पारदर्शक आणि सुरक्षित असलेला हा नव्या (नॅनो) सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने राजगुरूनगर नागरिकांसाठी आनंद गॅस एजन्सीच्या माध्यमातून या नव्या सिलिंडरची सेवा सुरू केली आहे.

 

नव्या हा नवीन सिलिंडर पारंपरिक सिलिंडरच्या तुलनेत वजनाने हलका असल्याने त्याची हाताळणी करणे ग्राहकांना अधिक सोपे होत आहे. ग्राहकांना कमी वेळेत,अधिक सोप्या पद्धतीने आणि त्वरित नवीन कनेक्शन मिळत आहे.वजनाने हलका, पारदर्शक रचना, सुरक्षितता आणि जलद गॅसची होम डिलिव्हरी या वैशिष्ट्यांमुळे हा 'नव्या' सिलिंडर राजगुरूनगर  ग्राहकांना विशेषतः महिला वर्गाला उपयुक्त ठरणार आहे. एचपी कंपनीने राजगुरूनगर शहरासाठी नव्या गॅस विक्रीची  परवानगी फक्त आनंद गॅस एजन्सीला दिली आहे.
 

नव्या गॅस सिलेंडर राजगुरूनगर शहरातील नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.आधारकार्ड घेऊन या आणि सिलेंडर घेऊन जावा. भारत देशातील रहिवाशी असल्याचा आधारकार्ड पुरावा ग्राह्य धरून ग्राहकाला गॅस सिलेंडर सुविधा दिली जात आहे. नव्या गॅसचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. - आनंद डोळस - आनंद गॅस एजन्सी, राजगुरूनगर