Khed | अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षात प्रवेश केल्याने खेडच्या शिवसेनेत खळबळ उडाली

शिरूर लोकसभा मतदासंघांत निवडणुकीचे रणसंग्राम चालू असताना खेड तालुक्यातील शिवसेना पक्षात विधानसभेच्या जागेवरून खळबळ उडाली आहे.

Khed | अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षात प्रवेश केल्याने खेडच्या शिवसेनेत खळबळ उडाली

 

 

महावार्ता लाईव्ह | शिरूर लोकसभा ( shirur loksabha) मतदासंघांत निवडणुकीचे रणसंग्राम चालू असताना खेड तालुक्यातील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )(shivsena) पक्षात विधानसभेच्या जागेवरून खळबळ उडाली आहे.खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये (दि.११) प्रवेश केला आहे.

 

 

देशमुख ( Atul Deshmukh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sp) या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल. उमेदवारीचा शब्द देशमुखांना राष्ट्रवादी काँग्रेस (sp) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar) खासदार अमोल कोल्हे ( amol kolhe) यांच्याकडुन मिळाला आहे का? त्यामुळे देशमुखांचा प्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का? असे विविध प्रश्न निर्माण झाल्याने उबाठा शिवसेना ( Shivsena )गटामध्ये खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अतुल देशमुख ( Atul Deshmukh) यांनी २०१९ ची  विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांनी आमदार दिलीप मोहिते ( MLA Dilip mohite patil ) आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे ( Suresh Gore) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. देशमुख यांना अपक्ष असताना ५५ हजार मते पडली होती. त्यामुळे अतुल देशमुख यांनी २०२४ ची खेड विधानसभा निवडणुक पुन्हा लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.

त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ( NCP Sp) प्रवेश केला आहे अशी जोरदार चर्चा आहे. विधानसभेच्या जागेवर देशमुख दावा सांगतील त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारातही न जाता जोपर्यंत विधानसभेची जागा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )( shivsena) गटाला मिळत नाही हे स्पष्टीकरण वरिष्ठाकडून होत नाही तोपर्यंत खासदार कोल्ह्यांचा प्रचार करणार नाही असाही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आक्रमक झाले आहेत. 

 

 

विधानसभेची खेडची जागा ही शिवसेनेची आहे. त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नाही यावर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र ठाम आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे (NCP sp ) जाते की शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Shivsena ) पक्षाकडे राहते हे मात्र पाहणे उत्सुक्याचे आहे.