'आजादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : अँड देविदास शिंदे पाटील.
राजगुरूनगर : प्रतिनिधी
भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 'आजादी का अमृत महोत्सव' या अभियानातंर्गत आयोजित कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील सुजान नागरिकांनी 'आपला देश आपले कर्तव्य' समजून सहभागी व्हावे,असे आवाहन खेड तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड देविदास शिंदे पाटील यांनी आळंदी येथे केले.
आळंदी नगरपरिषद येथे कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन करताना वकीलबारचे अध्यक्ष अँड शिंदे पाटील बोलत होते.यावेळी आळंदीच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर,आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगरपरिषदेचे अनेक नगरसेवक,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाला बारचे उपाध्यक्षअँड.गणेश गाडे पाटील,अँड रीना मंडलिक,खजिनदार अँड माणिक वायाळ, बारचे माजी अध्यक्ष अँड संदीप घुले,अँड नवनाथ गावडे, अँड नीलेश चौधरी,अँड स्मिता घुडरे,सरसेनापती हंबीरराव विधी महाविद्यालयाच्या प्रा.चव्हाण मॅडम व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास अँड स्मिता घुंडरे यांनी महिलांच्या कायदे विषयी माहिती दिली,तर अँड निलेश चौधरी यांनी जन्म मृत्यू कायदे संबंधी व विवाह नोंदणी कायदे विषयी तसेच मेडिटेशन संदर्भात मार्गदर्शन केले.अनेक विद्यार्थ्यांनी देखील मार्गदर्शन केले.शिबिरात अनेक कायदे विषयी माहिती मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.प्रास्ताविक करून आभार उपाध्यक्ष गणेश गाडे यांनी मानले.
