Khed | शेलू-भांबोली विकास सोसायटी चेअरमनपदी पांडुरंग चिंधु सांडभोर यांची बिनविरोध निवड

Khed | शेलू-भांबोली विकास सोसायटी चेअरमनपदी पांडुरंग चिंधु सांडभोर यांची बिनविरोध निवड

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शेलू-भांबोली विकास सोसायटी चेअरमनपदी पांडुरंग चिंधु सांडभोर यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन सांडभोर यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन संचालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार झाला.

 

ठरल्याप्रमाणे मुदत संपताच तुकाराम बबन पडवळ यांनी चेअरमनपदाचा राजीनामा राजीनामा दिला.त्यामुळे रिक्त पदाची निवडणूक राजगुरूनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी सविता बगाटे यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.बगाटे यांना निवडणुकीत मदत सोसायटी सचिव निलेश देशमुख यांनी केली.चेअरपानपदाची निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 

निवडणूक प्रसंगी सभागृहात व्हाईस चेअरमन चांगुणाबाई राळे,संचालक शिवाजी पडवळ,नामदेव पडवळ,ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष सांडभोर,मीराबाई पडवळ हे उपस्थित होते.तसेच माजी उपसरपंच दत्तात्रय करंडे, महाराष्ट्र वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लांडगे,कृष्णराव सांडभोर,पांडुरंग पडवळ,गणेश पडवळ, दिलीप पडवळ,सागर पडवळ,मयूर राळे,सत्यवान ढोरे,गणपत सांडभोर,विकास सांडभोर,महेश पडवळ,मच्छिन्द्र कचाटे,अरुण सांडभोर,दिलीप कारले आदीच्या उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन सांडभोर यांचा फेटा बांधून व गळ्यात हार व पुष्पगुच्छ देऊन झाला.निवडणूक बिनविरोध झाल्याने शेलू व भांबोली  या दोन्ही गावचे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.