खेड तालुक्यातील घटना : गाडी चालकाने केला ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
राजगुरूनगर : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाडी चालकाने ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.गौतम भांबुरे (रा.भांबुरवाडी ता.खेड) असे आरोपीचे नाव असून खेड पोलिसांनी त्याला अटक केली. घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
राजगुरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित ५ वर्षीय मुलगी राजगुरूनगर येथे खाजगी शाळेत शिकत आहे.आरोपी भांबुरे हा गाडीत शाळकरी मुलांना खाजगी शाळेत ने-आण करण्याचे काम करीत आहे.(दि.१२) रोजी आरोपीने पिडित मुलीला घरी सोडविण्यासाठी जाताना राजगुरूनगर शहरालगत भांबुरवाडी घाटात ईको गाडी थांबवून ५ वर्षीय पिडित मुलीसोबत लैंगिक चाळे करून आरोपीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला पीडित मुलीला बळजबरीने हात लावण्यास सांगून अश्लील वर्तन केले.
याबाबत घरी कुणाला सांगायचे नाही असे आरोपीने ओरडून पीडित मुलीला सांगितले.मुलीने घरी आल्यानंतर आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगितला.पोक्सो कायद्यांतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केली.या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.
