वराळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण बुट्टेपाटील पाटील यांची निवड

वराळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण बुट्टेपाटील पाटील यांची निवड

राजगुरूनगर - प्रतिनिधी
     वराळे ( ता.खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासाठी पालक सभेचे आयोजन केले असता सभेस बहुसंख्येने पालक उपस्थित होते. यावेळी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा मार्गदर्शक सूचना नुसार शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण गोविंद बुट्टे पाटील यांची,तर उपाध्यक्षपदी सुवर्णा महेश ठाकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
         यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकर व नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी शाळा व्यवस्थापन समितीने पुढील काळात नियोजित कामे करण्याची माहिती सर्व पालकांना व नवनिर्वाचित सदस्यनां दिली.  मनिषा कुंभार मॅडम यांनी आभार मानले.