Manchar ST Bus Gold Theft Gang | मंचर एसटी बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन आरोपी अटकेत, ४ लाख ९० हजारांचे चार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत; चोरीचे दोन गुन्हे उघडकीस

Manchar ST Bus Gold Theft Gang | मंचर एसटी बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

खेड तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी टंचाई आराखड्यातील कामे प्राधान्याने मार्गी लावणार : सभापती अमोल नलावडे ​​​​​​

महावार्ता लाईव्ह | मंचर एसटी बसस्थानक परिसर तसेच एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या अंगावरील आणि पिशवीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चार तोळे वजनाचे सुमारे ४ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून मंचर पोलिस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.


पोलिस पथके मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मंचर एसटी बसस्थानकावर आणि एसटी बसमध्ये सोन्याचे दागिने चोरणारी टोळी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मंचर एसटी बसस्थानक परिसरात सापळा रचला.


यावेळी बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अशोक बबन भोसले, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. हिवरगाव फाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मंचर एसटी बसस्थानक परिसरात तसेच एसटी बसमध्ये महिलांच्या गळ्यातील आणि पिशव्यांमधील सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती समोर आली. या चोरीमध्ये त्याला एका महिलेसह अन्य साथीदारांची मदत असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले.


त्यानंतर पोलिसांनी अशोक बबन भोसले, अश्विनी अविनाश भोसले, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर आणि सतीश मधुकर गोरे, रा. शिवाजीनगर, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. या आरोपींकडून मंचर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा  दाखल करत गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मंचर पोलिस ठाण्यातील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

 

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद बांबळे, तसेच संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, अतुल डेरे आणि मंचर पोलिस ठाण्यातील सुदाम घोडे, संजय नाडेकर, शेखर भोईर, योगेश रोडे, अजित पवार, विनोद जांभळे व महिला पोलिस कर्मचारी अलिशा शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.