Diwali special | माऊलीशेठ करंडे यांच्याकडून आदिवासी व कातकरी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

सामाजिक बांधिलकी या भावनेतून ते गोरगरीब कुटुंबांना गेल्या १५ वर्षांपासून माऊलीशेठ करंडे मदत करत आहेत

Diwali special | माऊलीशेठ करंडे यांच्याकडून आदिवासी व कातकरी बांधवांना दिवाळी फराळ वाटप

 

राजगुरूनगर : शहरातील उद्योजक व साई ट्रेड सेंटरचे मालक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊलीशेठ करंडे यांनी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आव्हाट,डेहणे व भोरगिरी या गावच्या ठिकाणी असलेल्या आदिवासी व कातकरी बांधवांच्या वस्तीतील कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केला.करंडे हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून राबवित आहेत.

 

आव्हाट,डेहणे व भोरगिरी या गावातील आदिवासी व कातकरी बांधवांच्या वस्तीतील कुटुंबांना करंडे यांनी दिवाळी फराळ वाटप बुधवारी (दि.३०) रोजी वाटप केला.फराळ वाटप प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिलबाबा राक्षे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी विकास गोपाळे,हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी संचालक किसनराव गारगोटे,डेहणेचे माजी सरपंच शंकर कोरडे,एकनाथ आरबूज (डॉक्टर) आदी उपस्थित होते.दिवाळी फराळ मिळाल्यानंतर आदिवासी व कातकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला.

 

माऊलीशेठ करंडे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून सामाजिक बांधिलकी या भावनेतून ते गोरगरीब कुटुंबांना गेल्या १५ वर्षांपासून मदत करीत आले आहेत.कोरोना काळात रस्त्याने पायी जाणाऱ्या शेकडो लोकांना ते दररोज सकाळी नाष्टयाची व्यवस्था करायचे.चांडोली येथील कातकरी लोकांना त्यांनी ब्लॅंकेट वाटप केले.दिवाळी फराळ वाटप करण्याचा त्यांचे १५ वे वर्ष आहे.