Crime News | पिंपरी-चिंचवड: महाळुंगे येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; अवघ्या ४ तासांत आरोपींना अटक

महाळुंगे इंगळे येथे राहुल निषाद या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर महाळुंगे पोलिसांनी अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या.

Crime News | पिंपरी-चिंचवड: महाळुंगे येथे तरुणावर जीवघेणा हल्ला; अवघ्या ४ तासांत आरोपींना अटक
 

महावार्ता लाईव्ह | महाळुंगे इंगळे परिसरामध्ये एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या दोन आरोपींना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत सिनेमॅटिक पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तांत्रिक आणि पारंपरिक तपासाच्या जोरावर ही धडक कारवाई करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

 

▪️हे सुद्धा वाचा | आंबेगाव, जुन्नर, हवेलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; शिवाजी आढळराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शामकुमार निषाद (वय २३ वर्षे, सध्या रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. विंध्याचल, ता. कटरा कोतवाली, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) हा तरुण दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्यावेळी महाळुंगे स्मशानभूमीजवळ आरोपी ओम चंद्रकांत बहादुरे आणि अनिल रामराव आघाडे यांनी राहुलला अडवले. जुन्या वादातून अथवा इतर कारणावरून आरोपींनी राहुलला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर आणि हातावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला.

 

 

घटनेनंतर राहुल निषाद याच्या तक्रारीवरून उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आरोपी ओम बहादुरे आणि अनिल आघाडे यांच्याविरोधात गुन्हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांचा पाठलाग आणि ४ तासांत अटक

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे माहिती मिळवली. गुन्ह्यानंतर आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांचा कसून पाठलाग केला आणि गुन्हा घडल्यापासून अवघ्या चार तासांच्या आत दोघांनाही ताब्यात घेतले.

 

▪️हे सुद्धा वाचा | खेड तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी टंचाई आराखड्यातील कामे प्राधान्याने मार्गी लावणार : सभापती  अमोल नलावडे - https://mahavartalive.com/to-resolve-water-shortage-in-khed-taluka-works-in-the-scarcity-plan-will-be-implemented-on-priority-speaker-amol-nalawade

 

कारवाई करणारे पोलीस पथक

सदरची उल्लेखनीय कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

तसेच पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त (महाळुंगे विभाग) प्रिया डमाळे, आणि उत्तर महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, तसेच पोलीस शिपाई बापुराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे व समीर महात यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

 

आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.