टाकळकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.साधना सचिन टाकळकर यांची बिनविरोध निवड.मिरवणुकीत गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण.

टाकळकरवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदी सौ.साधना सचिन टाकळकर यांची बिनविरोध निवड.मिरवणुकीत गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण.

राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेल्या टाकळकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.साधना सचिन टाकककर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच निवड झाल्यानंतर मिरवणुकीत गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण झाली.
      खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर टाकळकरवाडी गावाला अनन्यसाधारण महत्व असल्याने ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांना तालुक्यात मोठा मान मिळतो ही सत्यस्थिती आहे. सर्वांना पदाची संधी मिळावी म्हणून शारदा आनंदराव टाकळकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त सरपंचपदाची निवडणूक गुरुवार (दि.१४) ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक अधिकारी सविता घुमटकर (मंडलाधिकारी) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. साधना टाकळकर यांचाच एकमेव अर्ज सरपंचपदासाठी आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा घुमटकर यांनी सदस्यांच्या उपस्थितीत केली. निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेविका माधुरी भारती व तलाठी बबन लंघे यांनी पाहिले.


       निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळत्या सरपंच शारदा टाकळकर,उपसरपंच राजाराम टाकळकर,ग्रामपंचायत सदस्य कारभारी टाकळकर,सत्यभामा टाकळकर,सुजाता टाकळकर, शितल टाकळकर उपस्थित होते. माजी सरपंच काळूराम टाकळकर,आनंदा टाकळकर, माणिक टाकळकर मारुती टाकळकर,बाजीराव टाकळकर, बाबासाहेब टाकळकर,राजेंद्र टाकळकर,सत्यवान टाकळकर, रोहिदास टाकळकर,गणेश टाकळकर,शिवाजी टाकळकर, मयूर पवार,योगेश टाकळकर, उत्तम टाकळकर,अभिमन्यू टाकळकर,राहुल टाकळकर, सचिन टाकळकर,गणेश टाकळकर,अनुप टाकळकर, भगवान टाकळकर, राजेश पवार, सुजित टाकळकर,अजय टाकळकर उपस्थित होते.
यावेळी जेष्ठनेते नानासाहेब टाकळकर यांनी मार्गदर्शन केले.
-----------------------------------------------------------------------------