कोये गावाला जल जीवन मिशन मधून ३ कोटींची पाणी योजना मंजूर : शरद बुट्टेपाटील

कोये गावाला जल जीवन मिशन मधून ३ कोटींची पाणी योजना मंजूर : शरद बुट्टेपाटील

राजगुरूनगर : प्रतिनिधी

जल जीवन मिशन या केंद्र सरकारच्या घरोघरी नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वकांक्षी योजनेतून को ये गावाला बारमाही पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती या भागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.

     सध्या कोये गावाला कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. तसेच चार ठाकरवाड्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत होता. यावर मार्ग काढण्यासाठी येथून चार किलोमीटर आंतर असणाऱ्या भामा नदी वर नव्याने झालेल्या धोपटवाडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधारे लगेच विहिरी घेऊन ही पाणी योजना केली जाणार आहे.

     या पाणीपुरवठा विषयामध्ये ९७०० मीटर लांबीची १६६ एमएम ची मुख्य लाईन टाकली जाणार आहे तर १२३५० मीटरची मित्र लाईन टाकली जाणार आहे. तीस एचपी च्या विद्युत पंपाचा यामध्ये समावेश असून पंपांना पुरेसा वीजपुरवठा करावा म्हणून स्वतंत्र ट्रांसफार्मर ची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.   

          या योजनेमुळे गावठाणासह बिंसाबा ठाकरवाडी ,वरची बिंसाबा ठाकरवाडी, मोघुची वाडी, काळेचीवाडी, माळवाडी या सर्व वस्त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यासाठी जुन्या साठवून टाकी बरोबरच बीसांबा ठाकरवाडी येथे ३४००० लिटर क्षमतेची नवीन टाकी देखील बांधली जाणार आहे.     

                         सदर योजना करण्यासाठी आम्ही मोठा पाठपुरावा केला होता तसेच आम्हाला भामा नदी पात्रात जवळ खाजगी मालकाकडून जमीन खरेदी करावी लागली त्यांच्या परवानग्या काढण्यासाठी देखील बराच वेळ गेला. यासाठी आम्हाला अनेक वेळेला जिल्हा परिषद मध्ये जावे लागले. विहिरीची जागा खरेदी आणि योजनेचा डीपीआर करण्यासाठी देखील ग्रामपंचायतीने आपल्या स्वनिधीतून आर्थिक तरतूद केली होती. याकामी आम्हाला आमचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी मोठे सहकार्य केले आहे अशी माहिती सरपंच रामदास राळे व उपसरपंच सारिकाताई राळे यांनी दिली.

    या योजनेमुळे आम्हाला बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल आणि विशेष करून ठाकरवाडी यांना न्याय मिळेल अशी भावना ग्रामस्थ पोपट राळे ,बबन राळे, साहेबराव खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य सागर राळे ,गोविंद राळे, रंगनाथ राळे, काळूराम पारधी, सुवर्णा महाले,सुरेखा पऱ्हाड,योजना घनवट यांनी व्यक्त केल्या.

----------------------------------------------------------------------