दौंड महावितरणचा इशारा : ३१ मार्च पर्यंत वीज बिल भरा

दौंड तालुक्यात कृषीपंपाच्या थकीत विज बिलावरुन महावितरण कंपनी आणि शेतकरी यांच्यात मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. महावितरण कंपनीने कृषीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी सरसकट वीज तोड मोहीम राबवली.यामुळे महावितरण विरोधात शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.

दौंड महावितरणचा इशारा : ३१ मार्च पर्यंत वीज बिल भरा

दौंड : न्यूज नेटवर्क

दौंड तालुक्यात कृषीपंपाच्या थकीत विज बिलावरुन महावितरण कंपनी आणि शेतकरी यांच्यात मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. महावितरण कंपनीने कृषीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी सरसकट वीज तोड मोहीम राबवली. यामुळे महावितरण विरोधात शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे महावितरण कंपनी शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज तोड मोहीम थांबवेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना ३१ मार्चचा एल्टीमेटम दिला आहे. ३१ मार्चच्या आत वीज बिले भरण्याचे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

दौंड तालुक्यात महावितरण कंपनीच्या वीज तोड मोहीमेविरोधात शेतकरी संघटना आणि भाजप आक्रमक झाली आहे. दौंड, पाटस, रावणगाव, कानगाव, राहु, केडगाव (दापोडी) याठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले आहे.

महावितरण कंपनी आणि राज्य सरकारने कृषीपंपाची थकीत वीज बिले माफ करावी, वीज तोड मोहीम थांबवून वीज पुरवठा चालू करावा अशी मागणी आंदोलक शेतकरी करीत आहेत. तालुक्यात महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. असे असताना दौंड महावितरण (दौंड ग्रामीण शाखा ) कंपनीने तालुक्यातील पाटस, गिरीम, राजेगाव, मलठण, देऊळगावराजे, नानवीज, सोनवडी, वाटलूज, नायगाव, शिरापूर, पेडगाव, वडगाव दरेकर, हिंगणीबेर्डी, काळेवाडी, गार, खानोटा, बिरोबावाडी, बेटवाडी, लिंगाळी, गोपाळवाडी, आलेगाव, खोरवडी, मसनरवाडी, बोरीबेल, या भागातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कृषी धोरण २०२० मध्ये माफ झालेली ५० ते ६६ टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम भरायची मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपत असल्याने शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत माफ होऊन उर्वरित राहिलेली वीज बिलाची रक्कम तसेच चालू बिलांचा भरणा न केल्यास माफ झालेली रक्कम पुन्हा बिलात लागणार आहे. त्यामुळे यापूर्वी ज्यांनी-ज्यांनी बिलाचे हफ्ते भरलेले आहेत.

त्या शेतकऱ्यांनी दौंड ग्रामीण शाखा कार्यालयात आपल्या बिलाची माहिती घेऊन ते ३१ मार्च २०२२ च्या आत पूर्णपणे भरून थकबाकी मुक्त व्हावे आणि महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. त्यामुळे ३१ मार्चच्या आत थकीत आणि माफी झालेली रक्कम वजा करून उर्वरीत वीज बिले न भरल्यास पुन्हा वीज तोड मोहीम सुरू करण्याचा सुचक इशाराच महावितरण कंपनीने या निमित्ताने शेतकऱ्यांना दिला आहे.

------------------------------------------------------------------