प्रियकराच्या पत्नीचा खून करणाऱ्या प्रियसीला बेड्या
राजगुरूनगर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलेच्या खुनाचा छडा लावून पतीच्या प्रियसीला दोन दिवसात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राजगुरूनगर पोलीस स्टेशनला यश
राजगुरूनगर : राजगुरूनगर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलेच्या खुनाचा छडा लावून पतीच्या प्रियसीला दोन दिवसात जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व राजगुरूनगर पोलीस स्टेशनला यश आले आहे. कोमल गणेश केदारी ( वय २८ वर्षे, रा. शिवसाम्राज्य सोसायटी, वाडारोड राजगुरूनगर ता.खेड ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रेयसी स्वाती सुभाष रेंगडे (वय २१ वर्षे सध्या रा. शेवंता पार्क सोसायटी, तिन्हेवाडी रोड, खेड ता.खेड जि.पुणे, मुळ रा. गोद्रे ता. जुन्नर जि.पुणे) हिस राजगुरूनगर पोलिसांनी अटक केली आहे. तिला (दि.२४) तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले आहेत.
सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की, राजगुरुनगर (ता.खेड) येथे कोमल ही तिचा पती गणेश भिकाजी केदारी हा कामावर गेल्यावर दुपारी एकटी घरात झोपली असताना तिचा कोणीतरी आज्ञात इसमाने गळा आवळुन खून केला.या घटनेबाबत राजगुरूनगर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.काही पुरावा नसताना खून कोणी केला असेल ? याबाबत पोलीसांपुढे मोठ आव्हान होते.गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने करण्याबाबत सूचना ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी गुन्हयाची उकल करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केल्या.खेड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन दिवसात गुन्हयाचा छडा लावला.मृत कोमल हीचा पती गणेश केदारी ह्याच्या प्रियसीनेच खून केला असल्याचे निष्पन्न होऊन तिला पोलिसांनी अटक केली.
सदरची कामगिरी अंकीत गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे,खेडचे डीवायएसपी सुदर्शन पाटील, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,खेडचे पोलीस निरिक्षक विजयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, राहुल लाड,अभिजीत सावंत,हवालदार विक्रम तापकीर, राजू मोमीन,पोलीस निलेश सुपेकर,दगडु विरकर,शंकर भवारी,कैलास कड,संतोष घोलप,संतोष मोरे,सचिन जतकर,प्रविण गेंगजे,भंडारी,सोनुने,लोहार,नि
