स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो - आमदार दिलीप मोहिते पाटील

एस.एन.इंग्लिश मीडियम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो - आमदार दिलीप मोहिते पाटील

राजगुरूनगर : शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अंगातील उपजत कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळतो आणि विद्यार्थी आवडीच्या कलेत पारंगत होतो.त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम महत्वाचा असल्याचे विचार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

राक्षेवाडी (ता.खेड) येथील एस.एन.इंग्लिश मीडियम शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी आ.मोहिते बोलत होते.यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अशोकदादा राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे,नगरसेविका स्नेहल राक्षे,राजगुरूनगर बँकेचे संचालक विनायक घुमटकर,गणेश थिगळे,राक्षेवाडीचे उपसरपंच मच्छिंद्र राक्षे, मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन राक्षे,भांबुरवाडीचे सरपंच संतोष ढोरे,पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे, शहराध्यक्ष सुभाष होले,चेतन पिंगळे,श्रीकृष्ण भांबुरे आदी उपस्थित होते.नितीन राक्षे यांनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केला.

इंग्लिश मीडियम शाळेला शासनाकडून मान्यता मिळते,पण शासनाचे अनुदान मिळत नाही.समाजाच्या सर्व स्थरातील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन शिक्षण संस्था चालविणे संस्थांचालकांचे पवित्र काम असल्याचे विचार  व्यक्त करून आ.मोहिते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक उत्तम राक्षे यांनी केले.आभार प्राचार्य मानसी मेदगे यांनी मानले.