महाराष्ट्रात सर्वधिक उच्चांकी लसीकरण करणारे करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले अव्वल.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रात ५७९९३ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केल्याने महाराष्ट्रात सर्वधिक उच्चांकी लसीकरण करणारे करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अव्वल ठरले आहे.
राजगुरूनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रात ५७९९३ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण केल्याने महाराष्ट्रात सर्वधिक उच्चांकी लसीकरण करणारे करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अव्वल ठरले आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक कार्यक्षेत्र असणारे करंजविहीरे प्राथमिक आरोग्य केंद्र असून डोंगरी ग्रामीण व शहरी भाग या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येतो. करंजविहिरे आरोग्य केंद्रातर्गत गडद,वहागाव,शिवे,कोरेगाव खुर्द,वराळे,येलवाडी,खालुम्ब्रे महाळुंगे इंगळे,निघोजे, कुरुळी,चिंबळी,वाकी खुर्द या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये लसीकरण करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे केले आहे.करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष व या भागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच आणि कार्यकर्त्यांना लसीकरणासाठी योग्य दिशा दिल्याने त्यांनी गावोगावी अतिशय चांगले नियोजन करून प्रत्येक गावात लसीकरणासाठी विशेष परीश्रम घेतले.अनेक कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम केल्याने एवढे मोठे लसीकरण झाले.
लसीकरणासाठी गावोगावी जागेची व्यवस्था,इंटरनेट कनेक्शन नसेल तर वाय-फायची सुविधा,नागरिकांना लसीकरण केंद्रावर आणणे या सर्व कामांमध्ये ग्रामस्थांनी अतिशय चांगले सहकार्य केले.चाकणच्या परिसरातील मेदनकरवाडी,नाणेकरवाडी,खराबवाडी,महाळुंगे इंगळे, खालुम्ब्रे,निघोजे,कुरुळी,चिंबळी,मोइ,आंबेठाण,वराळे, सावरदरी,वासुली,शिंदे,भांबोली अशी नागरीकरण झालेली मोठी गावे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असल्याने मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागले. एमआयडीसीतील कामगार वर्ग या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असल्याने लसीकरणाचे मोठे आव्हान आरोग्य विभागाच्या पुढे होते.तरीही कर्मचाऱ्यांनी बाजी मारली.
पश्चिम भागाच्या गावातील व वाडीवस्तीवरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या रुग्णवाहिकेचा देखील उपयोग केला.तसेच काही खाजगी कंपन्यांनी सीएसआर च्या माध्यमातून देखील या कामी मदत केली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री महाजन यांनी दिली.
करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी ५७९९३ नागरिकांचे उच्चांकी लसीकरण करणारे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन शरद बुट्टे पाटील यांनी केले.
----------------------------------------
