Khed | राक्षेवाडीच्या सरपंचपदी सविता राक्षे यांची बिनविरोध निवड
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील राक्षेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सविता पांडुरंग राक्षे यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची अतिशबाजी करीत जल्लोष केला.ग्रामस्थांच्या उपस्थितीत फेटा बांधून व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार झाला.
सुरेखा राक्षे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाची निवडणूक सोमवारी (दि.११) ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली.सविता राक्षे यांनी सरपंचपदाचे नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिकारी सविता घुमटकर यांच्याकडे दाखल केले. अन्य नामनिर्देशनपत्र न आल्याने सरपंचपदी राक्षे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा घुमटकर यांनी सभागृहातील सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सारिका कडूसकर यांनी पहिले.
यावेळी सभागृहात बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य अशोक राक्षे, मावळत्या सरपंच सुरेखा राक्षे, उपसरपंच मच्छिन्द्र राक्षे, ग्रा.पं. सदस्य रविराज राक्षे, जितेंद्र सांडभोर, श्रद्धा सांडभोर, चांगुणाबाई थिटे, वैजयंता थिटे उपस्थित होते.त्यानंतर फेटा बांधून व गळ्यात पुष्पहार घालून सरपंच राक्षे यांचा सत्कार करण्यात आला.
निवडणूक प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम चव्हाण, जितेंद्र राक्षे, अमोल सांडभोर, पप्पूकाका राक्षे, बाळासाहेब सांडभोर,अशोक वाळुंज, विजय सांडभोर,अँड अनिल राक्षे, दत्ता सखाराम राक्षे, शिवाजी सांडभोर, विजय राक्षे, रामभाऊ राक्षे, सुलाभ राक्षे, धोंडिभाऊ राक्षे, हरिभाऊ राक्षे,महेश राक्षे आदी उपस्थित होते.
