खेडच्या एमआयडीसी क्षेत्रातील महत्वाच्या शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मायाताई राजू भांगरे यांची बिनविरोध निवड

खेडच्या एमआयडीसी क्षेत्रातील महत्वाच्या शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मायाताई राजू भांगरे यांची बिनविरोध निवड

चाकण : प्रतिनिधी 
   खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील शिंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.मायाताई राजु भांगरे यांची बिनविरोध निवड झाली.अनेकांच्या प्रयत्नाने उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.निवडीनंतर मिरवणुकीत गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण झाली.
      शिंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदाचा राजीनामा सोनाली टेमगिरे यांनी दिल्याने रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच सचिन देवकर यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात मंगळवारी (दि.१२)संपन्न झाली. उपसरपंचपदासाठी मायाताई भांगरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सरपंच देवकर यांनी केली.निवडणूक प्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित उपसरपंच मायाताई भांगरे,मावळत्या उपसरपंच सोनाली टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्य सायली टेमगिरे,संतोष पानमंद,सोनाली पानमंद,प्रकाश मेंगळे,संगीता केंदळे,सीताराम गायकवाड, माजी सरपंच शिवाजी माताळे,मारती मेंगळे,शांताराम भांगे, शिवराम भालेराव,ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर उपसरपंच मायाताई भांगरे यांचा ग्रामस्थांनी फेटा बांधून,पुष्पहार घालून सत्कार केला.निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक अतुल रावते यांनी पाहिले.
      आदिवासी समाजाला उपसरपंचपदाची संधी सर्वांच्या सहकार्याने दिल्याने त्यांनी ठाकरवाडीतील प्रश्न सोडवावेत. त्यांना सर्वतोपरी मदत सर्व ग्रामपंचायत आणि आपण करणार असल्याचे सरपंच सचिन देवकर यांनी सांगितले. यावेळी शिवाजी माताळे यांचे भाषण झाले.आभार ग्रामसेवक अतुल रावते यांनी मानले.
--------------------------------------------------------------------------------