भांबोली ग्रामपंचायतीवर महिलाराज

सरपंचपदाचा कारभार सौ.शीतल पिंजण यांनी स्वीकारला तर उपसरपंचपदी सौ.अक्षदा राऊत यांनी बिनविरोध निवड

भांबोली ग्रामपंचायतीवर महिलाराज

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील भांबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा पदभार सौ.शितल काळूराम पिंजन यांनी स्वीकारला.तर उपसरपंचपदी सौ.अक्षदा विजय राऊत यांनी बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर सरपंच,उपसरपंच यांचा शाल,श्रीफळ देऊन व गळ्यात पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत शितल पिंजन यांची बिनविरोध निवडीनंतर त्यांनी सरपंचपदाचा अधिकृत पदभार (दि.३) रोजी स्वीकारला.उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच पिंजन यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली.उपसरपंचपदासाठी एकमेव अक्षदा राऊत यांचेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा पिंजन यांनी सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवडणूक निरीक्षक म्हणून पंचायत समिती बांधकाम विभागातील शाखा अभियंता डी.डी.जंबुकर होते.ग्रामसेवक विकास विसे यांनी निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज पाहिले.निवडणूक आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

निवडणूक प्रसंगी सभागृहात ग्रामपंचायत सदस्य शरद निखाडे,गुलाब निखाडे,अर्जुन राऊत,सीमा लांडगे, कल्याणी राऊत उपस्थित होते.निवडणुकीवेळी भाजपा युवामोर्चा तालुकाध्यक्ष पै काळूराम पिंजन,जालिंदर राऊत, संपत राऊत,अंकुश राऊत,किसन पिंजन,सागर निखाडे, भाऊसाहेब गायकवाड,मुरलीधर राऊत,नंदू लांडगे,गोविंद राऊत,अंकुश कडाळे,पोलीसपाटील दीपक राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदस्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाईल.गाव विकास प्रक्रियेने पुढे नेण्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच शितल पिंजन व उपसरपंच अक्षदा राऊत यांनी निवडीनंतर सांगितले.