Pune | खेड तालुक्यात फुटणार बदलाची दहीहंडी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीने परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन
राजगुरूनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील एक दोन नाहीतर तब्बल ५० गावात परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन मंगळवारी (दि.२७) रोजी केले आहे.खेड तालुक्यासह जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन फॉउंडेशन वतीने केले आहे.
मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व तालुक्याचे युवानेते सुधीर मुंगसे यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे. तालुक्यातीलराजगुरूनगर,काळूस,भोसे,खरपुडी,शिवे, वाहगाव, आंबेठाण,शेलू,वासुलीफाटा,दावडी,रासे, मेदनकरवाडी यासह ५० गावात एकाचवेळी परिवर्तनाची दहीहंडी फोडण्यात येणार आहे.तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तनाची आवश्यकता असल्याने मुंगसे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली फॉउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडीचे आयोजन गावागावात करण्यात आलेले आहे.
राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायंकाळी ५ वाजता दहीहंडीचे आयोजन केले असून विजेत्या गोविंद पथकाला फॉउंडेशनच्या वतीने बक्षीस दिले जाणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी विशेष आकर्षण म्हणून वेड मालिकेतील अभिनेत्री जिया शंकर,लक्ष्मीच्या पाउलांनी मधील अभिनेत्री ईशा केसकर तर सुख कळले या मालिकेतील अभिनेत्री स्पृहा जोशी उपस्थित राहणार आहेत.तालुक्यातील गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन फॉउंडेशच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने परिवर्तन नक्की होणार आहे.जनतेची सेवा करणे हे ध्येय मनाशी ठेवून तालुक्यातील राजकारणात आहे.तालुक्यातील जनतेला सुविधा निर्माण करून सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सुधीर मुंगसे - मी सेवेकरी सोशल फॉउंडेशन
