Corporation election Rajgurungar : माजी आमदार मोहिते पाटलांचा पहिला शिलेदार बिनविरोध !  

प्रभाग ३ मधून दिनेश सांडभोरांची मोठी बाजी ; विकास चव्हाणांचा अर्ज मागे

Corporation election Rajgurungar : माजी आमदार मोहिते पाटलांचा पहिला शिलेदार बिनविरोध !  

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर नगरपरिषदेच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे व माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपल्या पक्षाचा पहिला नगरसेवक बिनविरोध करीत पहिलाच डाव जिंकला आहे. प्रभाग क्रमांक ३ (सर्वसाधारण गट ब ) मधून युवा उद्योजक तथा गुडलक लंच होमचे मालक दिनेश सांडभोर यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने हा प्रभाग बिनविरोध झाला.

 

या सर्वसाधारण (ब ) प्रभागात एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.यामध्ये दिनेश सांडभोर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष ), विकास चव्हाण – अपक्ष (माजी आमदार दिलीप मोहिते-पाटलांचे कट्टर समर्थक), मयूर होले – शिवसेना (एकनाथ शिंदे गट),योगीराज करवंदे – अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

 

 

अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिनेश सांडभोर यांनी गेल्या आठ-दहा दिवसांपासून अहोरात्र प्रयत्न सुरू ठेवले होते.मात्र खरा गेमचेंजर ठरला तो माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा राजकीय डावपेच आणि शिवसेना नेते अतुल देशमुख यांची साथ मिळाली आणि सांडभोर बिनविरोध झाले आहेत.

 

विकास चव्हाण हे मोहिते-पाटलांचे जवळचे निकटवर्तीय आणि प्रभागातील तुल्यबळ उमेदवार मानले जात होते.त्यामुळे त्यांचा अर्ज मागे घेणे कठीण समजले जात होते.पण मोहिते-पाटील यांनी स्वतः लक्ष घालून सांडभोर यांना अडीज वर्षे व चव्हाण यांना यांना अडीज वर्षे फॉर्मुला समोर ठेवत चव्हाण यांची समजूत काढली व मोहिते पाटील यांनी माघार घ्यायला सांगितल्यावर चव्हाण यांनी माघार घेतली. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटाचे तालुका नेते अतुल देशमुख यांनीही पक्षाचा उमेदवार मयूर होले यांचा अर्ज मागे घेऊन सांडभोर यांना मदत केली.तिसरे अपक्ष उमेदवार योगीराज करवंदे यांनीही माघार घेतल्याने प्रभागातील एक जागा बिनविरोध झाली. 

 

दिनेश सांडभोर यांना बिनविरोध करण्यासाठी माजी सभापती शांताराम चव्हाण, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विद्यमान संचालक अशोक दादा राक्षे, माजी सभापती सतीश राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे, राक्षेवाडीचे माजी सरपंच मच्छिन्द्र राक्षे,अमोलकाका सांडभोर, नामदेव चव्हाण, शिवसेनेचे सुरेश चव्हाण, दिलीप होले, बाळासाहेब देशमुख, पत्रकार दत्ता भालेराव, माणिक होरे, अशोक दुगड, योगेशदादा सांडभोर, सुभाष होले, साईनाथ करमारे, सुरेश तात्या सांडभोर, विजय नाना चव्हाण, नितीन ( पप्पू )आडवळे, गणेश तोत्रे, भरत पवार,संजय टाकळकर, संजय पवळे, सुदाम कराळे, जगदीश खंडिझोड, प्रशांत आरुडे, रमेश मलघे, गजानन मते, सुखदेव करमारे, वसंतराव सहाणे, वैभव सांडभोर, गोरख तोत्रे, अभिमन्यू सोनवणे, अशोक सुतार, तुषार दौंडकर, ज्ञानेश्वर बोंबले, प्रकाश सुर्वे, सुरेश पवार, वाळुंज सर संजय सुर्वे,नितीन घुले, सचिन पोखरकर, संतोष काळे, मुकुंदशेठ बोराडे, विकास राक्षे, समीर राक्षे भीमाशंकर राक्षे, तांबे साहेब, जयकुमार सांडभोर फौजी बबन बोरहाडे,  जाधव साहेब, उत्तम टाकळकर, पटेल परिवार, डॉ भुजबळ सर आदींनी प्रयत्न केले.

 


“हा विजय हा केवळ माझा नव्हे तर माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या विश्वासाचा आणि प्रभागातील जनतेच्या प्रेमाचा विजय आहे. मी राजगुरूनगरच्या विकासासाठी झोकून देऊन काम करेन,” अशी प्रतिक्रिया बिनविरोध निवड झालेले नगरसेवक दिनेश सांडभोर यांनी दिली.

 

 

मोहिते पाटील गटासाठी हा मोठा राजकीय नैतिक विजय मानला जात आहे.राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूकीत पहिलाच प्रभाग बिनविरोध जिंकल्याने उर्वरित प्रभागांतील त्यांच्या इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार बाबाजी काळे व मुरब्बी असलेले  माजी आमदार मोहिते पाटील पुढील रणनीती कशी आखतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.