Khed | सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने तालुकास्तरावर घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन
पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन
राजगुरूनगर : मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीनं गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, या हेतूने तालुकास्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी दिली.
पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणारे खेड तालुक्यातील कुटुंब सहभागी होऊ शकते. विजेत्यांना मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीनं आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७८८८०१४६३२ या क्रमांकावर १० सप्टेंबर पर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन सुधीर मुंगसे यांनी केले.
