Khed Gram Panchayat Officers Association election | खेड ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी शंकर ढोरे अध्यक्षपदी विजयी तर उपाध्यक्षपदी रवींद्र उगले व सचिवपदी बाबाजी चव्हाण बिनविरोध
अध्यक्षपदासाठी रंगली थेट लढत; इतर सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड, सलोख्याच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न
महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, शाखा खेड यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा सोहळा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. अध्यक्षपदासाठी शंकर काळुराम ढोरे आणि नितीन जिजाबा नाईकरे यांच्यात थेट लढत झाली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला असून बहुमताच्या जोरावर शंकर काळुराम ढोरे यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला. अध्यक्षपद वगळता संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली निवडणूक
जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद ढोले यांनी जबाबदारी पार पाडली, तर निवडणूक निरीक्षक म्हणून अक्षय खोमणे आणि देवेंद्र नलावडे यांनी कामकाजावर देखरेख ठेवली.
नवीन कार्यकारिणी जाहीर
निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, शाखा खेडची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली
▪️अध्यक्ष : शंकर काळुराम ढोरे, सचिव : बाबाजी भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्ष : रवींद्र रामचंद्र उगले, महिला उपाध्यक्ष : प्रतिभा हरिभाऊ डोंगरे, कोषाध्यक्ष : काकासाहेब जनार्दन मिंड, कार्याध्यक्ष : सुदाम भिवाजी कड, प्रसिद्धीप्रमुख : शरद सुभाष शिरसाठ▪️कार्यकारिणी सदस्य : अमोल दत्तात्रय भालेराव, प्रमिला मारुती सुळके, प्रमोद रामचंद्र बनसोडे, भागू भिवा आढारी, मधुकर पांडुरंग डवणे

बिनविरोध निवडीसाठी सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य
अध्यक्षपदाची निवडणूक वगळता संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एकमताने पाठिंबा दिला. त्यामुळे संघटनेत एकोपा आणि ऐक्याचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार
नवनिर्वाचित अध्यक्ष शंकर ढोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडून संघटना अधिक सक्षम आणि गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सर्व अधिकारी, जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
खेड शाखेची पंचवार्षिक निवडणूक यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीबद्दल सर्व पदाधिकारी आणि सदस्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नव्या नेतृत्वाकडून ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कमी वयात संचालक होण्याचा बहुमान
आसखेड बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी अमोल भालेराव हे या निवडणुकीत संचालक पदासाठी उभे होते. संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांच्याशी चांगला समन्वय असल्याने त्यांना या निवडणुकीत संचालक पदासाठी संधी देण्यात आली.संघटनेच्या इतिहासात कमी वयात संचालक होण्याची संधी त्यांना मिळाली आहे.भालेराव यांचेसह निवडून आलेल्या त्यांचे संघटनेचे पदाधिकारी यांचे ग्रामसेवक अधिकारी आणि मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.