धामणटेक येथे जुगार खेळणाऱ्या ४ जणांना पकडून पोलिसांनी केली अटक.२७ हजारांचा मुद्देमाल जप्त.
गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसलेंची जुगाऱ्यांवर दुसऱ्यांदा कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले.२७ हजारांचा मुद्देमाल जप्त.
राजगुरूनगर - प्रतिनिधी
खेड तालुक्यातील गोसासी गावच्या हद्दीत धामणटेक येथे एका पत्राशेडमध्ये पत्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून चार जणांना खेड पोलीस स्टेशन मधील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले.छाप्यात त्यांच्याकडील २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही धडक कारवाई गुन्हे शाखेचे प्रमुख असलेले पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले व त्यांच्या पथकाने केली.
जुगार खेळणाऱ्यांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 604/2021भा.द.वि.कलम 188,269 मु.जु.का.क 12 (अ) प्रमाणे पोलीस अंमलदार योगेष रघूनाथ भंडारे (ब.नं.1968) नेमणुक खेड पोलीस स्टेशन (ता.खेड) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी अमोल सुरेष वाघोले (वय 27) रा.वरूडे ता.खेड जि.पुणे,मंगेष नवनाथ षिंदे (वय 27) रा.चिवरी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद,गणेष खंडू पाटील (वय 25)रा.चिवरी ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद,योगीनाथ बाबूराव झिंगरे (वय 27) रा.चिवरी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना अटक केली आहे.
खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने जुगार खेळणाऱ्यांवर मागील १० दिवसांपासून जोरदार मोहीम उघडून पाच दिवसात दोन ठिकाणी छापा टाकून जुगाऱ्याना पकडून अटक केली.त्यामुळे चोरून जुगार खेळणारे यांचे धाबे दणाणले आहेत.गुन्हे शाखेचे प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांचे डॅशिंग भूमिकेने अनेक ठिकाणी जुगाऱ्यानी पत्ते खेळणे बंद केले आहे.भोसले यांच्या कडक भूमिकेचे समाजात स्वागत होत आहे.
