निधन वार्ता : शिंदे गावातील आदर्श गृहीणी कलाबाई पांडूरंग देवकर यांचे दुःखद निधन
कलाबाई देवकर या शिंदे गावातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम देवकर यांच्या मातोश्री होत
महावार्ता लाईव्ह | शिंदे (ता.खेड) गावातील एका आदर्श गृहीणी आणि कष्टाळू महिलेच्या निधनाने शिंदे गाव व परिसरातील लोकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. वयाच्या ६० व्या वर्षी कलाबाई पांडूरंग देवकर यांचे दुःखद निधन झाले आहे. निधनाने त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कलाबाई देवकर या स्वभावाने अत्यंत शांत, सौम्य आणि मेहनती होत्या. त्या नेहमी घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळत असत. त्यांचे पती पांडूरंग देवकर यांना शेतीच्या कामात पूर्ण साथ देत होत्या. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या कष्टाळू वृत्तीमुळे घरचा आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली. त्यांच्या पाठोपाठ दोन मुलगे, पती, सासू, आई, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे, जावई अशा मोठ्या परिवारावर शोकाची लाट गेली आहे.
कलाबाई देवकर या शिंदे गावातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम देवकर यांच्या मातोश्री होत. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या स्मृतींना उजळवताना भावुक झाला आहे. कलाबाई देवकर यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि घरातील प्रत्येकाला दिलेल्या आधारामुळे त्या सर्वांच्या मनात कायम राहतील. गावकरी आणि नातेवाईक त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभाग होते.