शिंदे गावातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अनिल गुलाबशेठ घनवट यांचे दुःखद निधन
अनिल घनवट हे आपल्या मेहनतीने, दूरदृष्टीने आणि समाजसेवेच्या भावनेने ओळखले जात होते.
महावार्ता लाईव्ह | शिंदे (ता.खेड) गावातील एक उत्साही युवा उद्योजक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गुलाबशेठ घनवट (वय ४०) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने गावातील तरुण वर्ग, शेतकरी समाज आणि संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. अनिल घनवट हे आपल्या मेहनतीने, दूरदृष्टीने आणि समाजसेवेच्या भावनेने ओळखले जात होते.
अनिल घनवट हे प्रामुख्याने शेती व्यवसायात सक्रिय होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. अनिल घनवट यांनी शिंदे गावातील तरुणांचे एक मजबूत संघटन उभे केले होते. अनिल घनवट हे उद्योजक सुरेश आण्णा घनवट यांचे पुतणे होते.
त्यांच्या पाठोपाठ पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण, मामा, चुलते, आत्या, चुलते भाऊ अशा मोठ्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्यांच्या स्मृतींना उजळवताना भावुक झाला आहे. अनिल घनवट यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, मदत करण्याच्या वृत्तीमुळे आणि नेहमी हसतमुख राहण्यामुळे ते सर्वांच्या मनात कायम राहतील.