खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील थिगळे तर उपाध्यक्षपदी अतुल भालेराव

कार्याध्यक्षपदी रोहिदास होले ; सचिवपदी किरण खुडे

खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील थिगळे तर उपाध्यक्षपदी अतुल भालेराव

राजगुरुनगर 

 

खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी सुनिल शांताराम थिगळे यांची तर उपाध्यक्षपदी अतुल दत्तात्रय भालेराव यांची निवड करण्यात आली.

 

खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सभा (दि.२६) रोजी खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर होते.सभेच्या प्रारंभी दिवंगत जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.बाबा महाराज सातारकर,मणिलालकाका कडधेकर,ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मश्री प्रभा अत्रे,चित्रपट अभिनेता रवींद्र महाजनी,अभिनेत्री सुलोचना लाटकर,सामाजिक कार्यकर्ते सखाराम ओव्हाळ,बिंदेश्वर पाठक,तसेच सिमेवरील शहीद जवान व दिवंगत ज्ञातअज्ञात देश बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्चाची माहिती सचिव किरण खुडे यांनी सभेला दिली.त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. 

 

सभेत पुढील २०२४-२५ या सालासाठी अध्यक्षपदी टीव्ही ९ चॅनेल व दै. प्रभातचे पत्रकार सुनिल थिगळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.तर सचिवपदी किरण खुडे यांची फेरनिवड झाली.अध्यक्षपदी निवडीनंतर थिगळे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले. 

 

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -

 

अध्यक्ष - सुनिल थिगळे ,कार्याध्यक्ष रोहीदास होले, उपाध्यक्ष आदेश भोजणे, अतुल भालेराव, सचिव किरण खुडे, सहसचिव किशोर गिलबिले, खजिनदार नाजिम ईनामदार, पत्रकार परिषद समन्वयक रोहीदास गाडगे, कायदेशीर सल्लागार ॲङ निलेश आंधळे, प्रसिद्धी प्रमुख सदाशिव आमराळे, सल्लागार म्हणून संघाचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, विद्याधर साळवे, राजेंद्र लोथे, महेंद्र शिंदे, बाळासाहेब सांडभोर, संदीप मिरजे, रामचंद्र सोनवणे.कार्यकारीणी सदस्य वनिता कोरे, अशोक कडलक, निवृत्ती नाईकरे, इसाक मुलानी.

 

याप्रसंगी माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, बाळासाहेब सांडभोर, संजय शेटे,जागर संघटनेचे सुदाम कराळे,ॲड निलेश आंधळे, अशोक कडलक, ॲड सोमनाथ नवले, अय्याज तांबोळी, प्रभाकर जाधव यांची भाषणे झाली.

 

तालुक्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या संघाचे अध्यक्षपद मला सर्व सहकाऱ्यांनी सोपवले त्याबद्दल मी आभारी आहे.भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी,पत्रकारांसाठी कार्यशाळा,आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष थिगळे यांनी यावेळी सांगितले.