आसखेड खुर्द सोसायटीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ लिंभोरे

आसखेड खुर्द सोसायटीच्या अध्यक्षपदी पंढरीनाथ लिंभोरे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आसखेड खुर्द विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ पंढरीनाथ शंकर लिंभोरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर लिंभोरे यांचा फेटा बांधून व शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ठरल्याप्रमाणे मुदतीत मारती लिंभोरे यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त  असलेल्या अध्यक्षपदाची निवडणूक (दि.२८) राजगुरूनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात  निवडणूक अधिकारी एस.एम.बगाटे यांनी काम पाहिले. त्यांना मदत सोसायटी सचिव चंदन पानसरेंनी केली. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठीचे नामनिर्देशनपत्र लिंभोरे यांचेच एकमेव आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा बगाटे यांनी सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत केली.निवड झाल्यावर सभागृहात लिंभोरे यांचा फेटा बांधून व शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

निवडणूक प्रसंगी सभागृहात बाजार समितीचे माजी  सभापती नवनाथ होले,सोसायटी उपाध्यक्ष माऊली शिंदे, सोसायटी संचालक कैलास लिंभोरे,संचालक शिवाजी लिंभोरे,भरत लिंभोरे,प्रकाश लिंभोरे,दत्तात्रय लिंभोरे, कुंडलिक लिंभोरे,बबन लिंभोरे,चांगुणाबाई लिंभोरे, सखुबाई लिंभोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सोसायटीच्या सभासदांनी घेतलेल्या कर्जाची फेड वेळेत केल्यानंतर त्यांना तातडीने खरीप व रब्बी दोन्ही हंगामात शेतात पीक घेण्यासाठी पीककर्ज तात्काळ दिले जाईल.शेतकऱ्यांना पीक आणि क्षेत्रानुसार कर्जाचे वाटप त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष पंढरीनाथ लिंभोरे यांनी सांगितले.