Khed | हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

Khed | हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 

राजगुरूनगर : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंडच्या वतीने शिरोली येथे हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

शिरोली येथील जाखमाता मंगल कार्यालयात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल ग्रामीण प्रखंडच्या वतीने संमेलन आयोजित केले होते.या संमेलनात प्रमुख वक्ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मप्रसार प्रमुख मृणालिनी पडवळ यांनी विश्व हिंदू परिषदेची कार्य या विषयी मांडणी केली.

 

 

 

पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मयात्रा महासंघ प्रमुख अशोक येलमार यांनी हिंदूंची सध्यस्थिती बांगलादेश,पश्चिम बंगाल आणि केरळ या ठिकाणी हिंदूंवर होणारे अत्याचार लव्ह जिहाद,लँड जिहाद गोहत्या आदी विषयांवर माहिती सांगितली.

कार्यक्रमाला माजी प्रांतमंत्री विजयराव देशपांडे,योगी महाराज,मानद पशुकल्याण अधिकारी निलेश आंधळे, भीमाशंकर जिल्हा सहमंत्री सुमितजी शिनगारे, सहसंयोजक अवधूत चौधरी,सह गोरक्षाप्रमुख दिपक गावडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.

 

 

 

संमेलनाचे सूत्रसंचालन मयूर लोहोट यांनी केले.प्रास्ताविक करून आभार खेड ग्रामीण प्रखंड मंत्री स्वप्नील साळुंके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल टाकळकर,विनोद लोहोट, योगेश पवार, किरण जाधव, दादू पोखरकर, ऋतुराज वाडेकर, समीर वाडेकर, नामा भोकसे, विठ्ठल पिंगळे, अभि पवार, शेखर वाळुंज, गणेश गुरव, प्रशांत आवटे, अनिकेत वाळुंज, वैभव राळे, अण्णामहाराज शिंदे, अक्षय जाधव, मछिंद्र रौंधळ, सायली पंडित, उषा टोपे यांनी प्रयत्न केले.

 

परीषदेचे जिल्हामंत्री संतोष खामकर, अध्यक्ष प्रशांत काळे, मातृशक्ती संयोजिका वैशाली लांडगे,भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, मी सेवेकरी फौंडेशनचे सुधीर मुंगसे यांनी भेट दिली. तर अश्वमेघ फाऊंडेशनचे अक्षय जाधव यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची सुरवात त्रिवार ओंकार व विजयमंत्राने होवून प्रेरणामंत्र व पसायदानाने सांगता झाली.