Khed - Aalandi Vidhansabha | चाकणमध्ये बाबाजी काळेंच्या पदयात्रेला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा विजय सुखकर - माणिक गोरे
चाकण | खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांची चाकण शहरात मोठ्या उत्साहात पदयात्रा निघाली, या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान एकतानगर परिसरातून निघालेली पदयात्रा झित्राईमळा भागात या पदयात्रेची सांगता करण्यात आली.
दरम्यान या पदयात्रेत अतुल देशमुख, माणिक गोरे, शेखर घोगरे, यांनी सहभाग घेतला. चाकण शहरातील सोसायटी, बाजारपेठ, भाजी बाजार परिसरात या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कामगार, व्यावसायिक, महिला, जेष्ठ नागरिकांशी उमेदवार बाबाजी काळे यांनी संवाद साधला. या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग पाहायला मिळाला.
माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या कुटुंबीयांचा सहभाग बाबाजी काळेंच्या पदयात्रेत पहायला मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. गजबजलेल्या चाकण शहरात बाबाजी काळे यांचा प्रचार दौरा पार पडला यामुळे बाबाजी काळे यांचा विजय सुखकर झाला असल्याचा विश्वास माणिक गोरे यांनी व्यक्त केला.
