Khed | वासुली ग्रामपंचायत नवीन तीन मजली इमारतीचे उदघाटन संपन्न

Khed | वासुली ग्रामपंचायत नवीन तीन मजली इमारतीचे उदघाटन संपन्न

ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन करताना आमदार दिलीप मोहिते व भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील व मान्यवर.

 

Khed | Vasuli Gram Panchayat inaugurated new three storied building

चाकण : खेड तालुक्याच्या एमआयडीसी क्षेत्रातील वासुली ग्रामपंचायतीने आपल्या स्वनिधीतून नव्याने उभारलेल्या सर्व सुविधायुक्त तीन मजली ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे हस्ते आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 

वासुली ग्रामपंचायतीने नवीन तीन मजली इमारत उभारली असून या इमारतीत ग्रामपंचायत सभागृह,ग्रामपंचायत मिटिंग हॉल तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक यांचे स्वतंत्र केबिन या सह पोस्ट ऑफिस,कृषी सहाय्यक,आरोग्य सेविका,वासुली-शिंदे विकास सोसायटी,स्थानिक पोलीसपाटील व आरोग्य सेविका व आशा वर्कर,एमएसइबी यांचे कार्यालय असलेल्या तीन मजली इमारतीचे उदघाटन (दि.८) रोजी संपन्न झाले.यावेळी बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे,संचालक रणजित गाडे,भाजपा युवामोर्चा उपाध्यक्ष काळुराम पिंजण,सरपंच कोमल साईनाथ पाचपुते,उपसरपंच दिपक लिंभोरे,वसंत भसे,सुनील देवकर, गणेश बोत्रे,दत्तात्रय मांडेकर,जयसिंग दरेकर,अमोल पानमंद,मीरा कदम,दत्तात्रय देशमुख,विजय केंदळे,प्रमिला कचोळे,ग्रामपंचायत सदस्य मीरा दहातोंडे,विक्रम पाचपुते,रविना शेळके,रत्ना पिंगळे, अशोक गावडे,ग्रामसेवक श्रीधर नाईकडे,बांधकामचे उपभियंता जयंत कचरे,शाखा अभियंता एस.डी.वाघमारे उपस्थित होते.

 

बोलताना आमदार मोहिते म्हणाले,परिसरात एमआयडीसी झाल्यामुळे या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचवले असून आर्थिकस्तर सुधारला आहे.ग्रामपंचायतीने कचरा डेपोसाठी वन विभाग जागा मागणी करून प्रस्ताव पाठवा प्रयत्न करणार आहे.

 

भाषणात बुट्टे पाटील म्हणाले,महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली.वासुली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सुंदर ग्रामपंचायत कार्यालय बांधल्याचे सांगून पीएमआरडीए कडे ग्रामपंचायतीचा ५० टक्के कर गेल्याने ग्रामपंचायती दुबळ्या झाल्या.कचरा डेपो  साठी एमआयडीसीने ग्रामपंचायतीला जागा ताब्यात द्याव्यात.

सरपंच कोमल पाचपुते यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन निवेदक आदेश टोपे यांनी केले.आभार उपसरपंच दिपक लिंभोरे यांनी मानले